Home क्रीडा ICC Cricket World Cup 2027 : आयसीसी वर्ल्ड कप २०२७ मध्ये होणार मोठे बदल? क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केली मोठी मागणी

ICC Cricket World Cup 2027 : आयसीसी वर्ल्ड कप २०२७ मध्ये होणार मोठे बदल? क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केली मोठी मागणी

0
ICC Cricket World Cup 2027 : आयसीसी वर्ल्ड कप २०२७ मध्ये होणार मोठे बदल? क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केली मोठी मागणी

मुंबई : आयसीसी वर्ल्ड कप २०२७ सुरू होण्यासाठी अजून खूप वेळ असला , तरी स्पर्धेच्या स्वरुपावरून क्रिकेट विश्वात चर्चा रंगली आहे. वर्ल्ड कप २०२७ दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया संयुक्तपणे आयोजित करणार आहेत. आयसीसीने नव्या स्पर्धा स्वरुपाची घोषणा झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक अँ मॅकडोनाल्ड यांनी आयसीसीशी मागणी केली आहे की, वर्ल्ड कप २०२७ साठी १५ ऐवजी १७ खेळाडूंचा संघ ठेवण्याची परवानगी देण्यात यावी.

https://prahaar.in/2026/07/29/icc-mens-rankings-vaibhav-makes-a-massive-leap-gill-and-ishan-kishan-claim-top-spots/

वर्ल्ड कप २०२७ चा नवीन फॉर्मेट

आयसीसीने जाहीर केलेल्या नव्या फॉर्मेटनुसार एखादा संघ फेरीपर्यंत पोहोचला तर त्याला तब्बल १५ सामने खेळावे लागतील. इतक्या मोठ्या स्पर्धेत खेळाडूंना दुखापत, खेळपट्टीतील बदल आणि विविध परिस्थितींचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे केवळ १५ खेळाडूंचा संघ अपुरा ठरू शकतो, असे मॅकडोनाल्ड यांचे मत आहे. त्यांच्या मते, १७ खेळाडूंचा संघ असल्यास संघ व्यवस्थापनाला विविध परिस्थितीनुसार संघरचना बदलण्याची अधिक संधी मिळेल आणि दुखापतींमुळे संघाची ताकद कमी होणार नाही. (ICC Cricket World Cup 2027)

https://prahaar.in/2026/07/29/major-decision-regarding-monsoon-fishing-in-maharashtra-permission-granted-to-resume-fishing-beyond-12-nautical-miles-starting-august-1/

अँड्रू मॅकडोनाल्डचे स्पष्टीकरण

या मागणीबाबत बोलताना अँड्रू मॅकडोनाल्ड म्हणाले, “कोणतीही स्पर्धा खेळताना तुम्हाला तुमच्या महत्त्वाच्या खेळाडूंशिवाय मैदानात उतरायचे नसते. सर्वोत्तम खेळाडू संपूर्ण स्पर्धेत उपलब्ध राहावेत, ही प्रत्येक संघाची इच्छा असते.” ते पुढे म्हणाले की, १७ खेळाडूंच्या संघाला परवानगी मिळाल्यास निवड समिती सर्वोत्तम १७ खेळाडूंची निवड करू शकेल. एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यास किंवा खेळपट्टी आणि परिस्थितीनुसार बदल करण्याची वेळ आल्यास संघाची गुणवत्ता फारशी कमी होणार नाही. मॅकडोनाल्ड यांनी या नवीन फॉर्मेटवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यांच्या मते या फॉर्मेटमुळे देशांना फारच कमी संधी मिळणार आहेत. (Andrew McDonald)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here