Home क्रीडा ICC Mens Ranking : आयसीसी रँकिंगमध्ये वैभवची मोठी झेप; गिल आणि ईशान किशानने फटकवले अव्वल स्थान

ICC Mens Ranking : आयसीसी रँकिंगमध्ये वैभवची मोठी झेप; गिल आणि ईशान किशानने फटकवले अव्वल स्थान

0
ICC Mens Ranking : आयसीसी रँकिंगमध्ये वैभवची मोठी झेप; गिल आणि ईशान किशानने फटकवले अव्वल स्थान

मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) बुधवारी २९ जुलै रोजी पुरुषांची फलंदाजीची क्रमवारी जाहीर केली आहे. वैभव सूर्यवंशीने आयसीसीच्या क्रमावरीत मोठी झेप घेतली आहे. झिम्बाब्वे विरूद्धच्या मालिकेत धमाकेदार कामागिरीसह त्याने आयसीसीच्या क्रमवरीत २३० स्थानांनी झेप घेत ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

https://prahaar.in/2026/07/29/17-year-old-girl-attacked-by-entering-house-in-parli-accused-dies-before-being-caught-by-police/

भारतीय फलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. ईशान किशन आणि शुभमन गिलने एकदिवसीय आणि टी-२० या दोन्ही प्रकारांमध्ये फलंदाजीच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकवले आहे. भारतीय कर्णधार शुभमन गिलने इंग्लंडविरुद्धच्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत तीन सामन्यात अर्धशतक करत आयसीसी एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. सध्या शुभमनच्या खात्यात ८०१ रेटिंग पॉईंट्स आहेत. (ICC Men’s Rankings)

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

टी-२० मध्ये वैभव सूर्यवंशीची ऐतिहासिक कामगिरी

अवघ्या १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने टी-२० मध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्याने झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन पैकी दोन सामन्यात अर्धशतक झळकावत आयसीसीच्या क्रमावरीत मोठी झेप घेतली आहे. त्याने नुकत्याच झिम्बाब्वेविरुद्ध झालेल्या मालिकेत ५० च्या सरासरीने १५१ धावा केल्या. तसेच त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय फलंदाजी क्रमावरीत २३० स्थानांची झेप घेत ४८ वे स्थान पटकावले आहे. त्याच्या खात्यात सध्या ५३६ रेटिंग पॉईंट्स आहेत.

 

 

ईशान किशनचे नंबर-१ स्थान कायम

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रमावरीत भारताचा डावखुरा सलामीवीर ईशान किशनचे अव्वल स्थान कायम आहे. झिम्बावेविरुद्धच्या मालिकेतील दुसर्‍या सामन्यात त्याने ८१ धावांची शानदार खेळी केली होती. या कामगिरीनंतर त्याने ९१६ रेटिंग गुण मिळवले. ईशानची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी होती. तसेच ही टी-२० इतिहासातील तिसरी सर्वोत्तम फलंदाजी रेटिंग ठरली. त्याच्यापुढे केवळ भारताचा अभिषेक शर्मा (९३१) आणि इंग्लंडचा डेव्हिड मलान (९१९) आहेत. झिम्बावेविरुद्धची टी-२० मालिका संपल्यानंतर ईशानचे रेटिंग गुण ९१० झाले असले तरी तो दुसऱ्या क्रमांकावरील साहिबजादा फरहान (८४८) पेक्षा खूप पुढे आहे.

 

 

टीम इंडिया पुन्हा अव्वल स्थानी

आयर्लंड आणि इंग्लंडमधील टी-२० मालिका गमावल्यानंतर भारतीय संघाने नंबर वनचा ताज गमावला होता. . मात्र झिम्बाब्वेला व्हाईटवॉश देत टीम इंडिया पुन्हा एकदा अव्वलस्थानी पोहचली आहे. सध्या ६१ सामन्यातील १६३५५ पॉइंट्स आणि २६८ रेटिंगसह भारतीय संघ नंबर वन आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here