Home ब्रेकिंग न्यूज Kolhapur Bull Incident Video : कोल्हापुरात बैलजोडी शर्यतीत थरार! बिथरलेला बैल जमावात घुसला अन् थेट…

Kolhapur Bull Incident Video : कोल्हापुरात बैलजोडी शर्यतीत थरार! बिथरलेला बैल जमावात घुसला अन् थेट…

0
Kolhapur Bull Incident Video : कोल्हापुरात बैलजोडी शर्यतीत थरार! बिथरलेला बैल जमावात घुसला अन् थेट…
Kolhapur Bull Incident Video

कोल्हापूर : कोल्हापूरच्या गडहिंग्लज तालुक्यातील भादगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलजोडी सौंदर्य आणि ताकद परीक्षण स्पर्धेत अचानक भीतीदायक प्रसंग ओढवला. मैदानावर परीक्षण सुरू असताना अचानक एक बैल बिथरला आणि त्याने थेट उपस्थितांच्या गर्दीत मुसंडी मारली. या अनपेक्षित हल्ल्यामुळे मैदानात एकच हलकल्लोळ माजला असून या घटनेत ६ नागरिक जखमी झाले आहेत.

नेमकं काय घडलं ?

 

View this post on Instagram

 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

मिळालेल्या माहितीनुसार, भादगाव गावात स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने निरोगी आणि धिप्पाड बैलजोड्यांच्या ताकदीचे व शारीरिक क्षमतेचे मूल्यांकन करण्यासाठी एका पारंपरिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागात अत्यंत लोकप्रिय असलेल्या या स्पर्धेला पाहण्यासाठी हजारो शौकीन व ग्रामस्थ जमले होते. मैदानावर बैलजोड्यांचे परीक्षण सुरू असतानाच, एका जोडप्यातील एक बैल अचानक बिथरला. काही समजण्याच्या आतच तो मालकाच्या हातातून दोर सोडून थेट मैदानातून प्रेक्षकांच्या दिशेने बेभान होऊन धावला.

व्यासपीठ सोडून न्यायाधीशांची धावपळ

https://prahaar.in/2026/07/29/japan-disposing-of-trash-in-japan-is-harder-than-the-upsc-exam-an-indian-womans-experience-she-was-left-amazed-by-japans-unique-waste-disposal-system/

बिथरलेल्या बैलाने आपला मोर्चा थेट मुख्य व्यासपीठ आणि न्यायाधीशांच्या गॅलरीकडे वळवला. सुसाट वेगाने अंगावर येणाऱ्या बैलाला पाहून व्यासपीठावर बसलेले पंच, आयोजक आणि अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले. जीव वाचवण्यासाठी प्रत्येकाने सैरावैरा पळ काढला. या चेंगराचेंगरीत आणि बैलाच्या धडकेत ६ जण जखमी झाले. आयोजकांनी तातडीने जखमींना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी हलवले आहे.

गटारात कोसळल्याने बैलाचे शिंग मोडले; व्हिडिओ तुफान व्हायरल

या थरारक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मैदानात सर्वत्र गोंधळ घातल्यानंतर, पळत सुटलेला हा बैल मैदानाशेजारील एका उघड्या गटारात जाऊन कोसळला. गटारात पडल्याच्या जोरदार दणक्याने बैलाचे एक शिंग मोडून तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर उपस्थितांनी व बैलाच्या मालकाने धैर्याने पुढे येत मोठ्या शिताफीने त्याला गटारातून बाहेर काढले आणि शांत करून घरी नेले. या अचानक घडलेल्या घटनेमुळे काही काळ स्पर्धा स्थगित करावी लागली होती. मात्र, बिथरलेल्या बैलाला मैदानातून सुरक्षित हटवल्यानंतर आयोजकांनी परिस्थिती पूर्ववत केली आणि उर्वरित कार्यक्रम शांततेत पार पडला. या घटनेची नोंद घेण्यात आली असून प्रशासन पुढील आढावा घेत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here