Home महाराष्ट्र ठाणे Thane District Hospital : ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाचे काम ‘फास्टट्रॅक’वर पूर्ण करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

Thane District Hospital : ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाचे काम ‘फास्टट्रॅक’वर पूर्ण करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

0
Thane District Hospital : ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाचे काम ‘फास्टट्रॅक’वर पूर्ण करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

ठाणे : ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या 900 खाटांच्या ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाचा प्रकल्प ‘फास्टट्रॅक’ पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी प्रकल्पाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना कामात कोणतीही दिरंगाई होऊ न देण्याच्या सूचना दिल्या. (Eknath Shinde)

https://prahaar.in/2026/07/28/veteran-journalist-laxmanrao-joshi-passes-away-lost-a-dedicated-editor-chief-minister-devendra-fadnavis/

बैठकीला आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर, मंत्री दादाजी भूसे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शंभूराज देसाई, संजय शिरसाट, संजय राठोड, प्रताप सरनाईक यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. (Palghar)

यावेळी रुग्णालयाची इमारत पूर्ण झाली असली तरी वीज जोडणीअभावी कामकाज सुरू होऊ शकले नसल्याची बाब समोर आली. त्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी रुग्णालयासाठी आवश्यक असलेली वीज जोडणीची सर्व कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच रुग्णालयाची स्वच्छता, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांची खरेदी आणि शासनाने मंजूर केलेल्या 1,078 नवीन पदांची भरती प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी दिले. (Thane)

या 900 खाटांच्या आरोग्य संकुलात 500 खाटांचे मुख्य जिल्हा रुग्णालय, 200 खाटांचे महिला व बाल रुग्णालय आणि 200 खाटांचे सुपरस्पेशालिटी रुग्णालय एकाच परिसरात कार्यरत राहणार आहे. कार्डिओलॉजी, न्यूरोलॉजी, नेफ्रोलॉजी आणि ऑन्कोलॉजीसारख्या विशेष उपचार सुविधा येथे उपलब्ध असतील. तसेच आपत्कालीन रुग्णांसाठी एअर अॅम्ब्युलन्स उतरू शकेल असे हेलीपॅड आणि 16 आधुनिक ऑपरेशन थिएटर्सचीही सुविधा या रुग्णालयात असणार आहे. ( Healthcare Infrastructure)

https://prahaar.in/2026/07/28/driver-turns-guardian-angel-bus-teetering-on-the-edge-of-a-200-foot-deep-gorge-drivers-quick-thinking-saves-the-lives-of-45-passengers/

हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील लाखो नागरिकांना जिल्ह्याबाहेर उपचारासाठी जाण्याची गरज भासणार नाही. अत्याधुनिक आणि सर्वसमावेशक वैद्यकीय सेवा त्यांच्या जिल्ह्यातच उपलब्ध होतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. ( Hospital Construction)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here