Home महाराष्ट्र कोकण Satellite Phone: खोल समुद्रातील मच्छिमारांसाठी सॅटेलाईट फोन सुविधा; महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय

Satellite Phone: खोल समुद्रातील मच्छिमारांसाठी सॅटेलाईट फोन सुविधा; महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय

0
Satellite Phone: खोल समुद्रातील मच्छिमारांसाठी सॅटेलाईट फोन सुविधा; महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय

खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या मच्छिमारांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत मच्छिमारांना सॅटेलाईट फोन उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात पाच मच्छिमारांना सॅटेलाईट फोनचे वितरण करण्यात आले. (Maharashtra Government)

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी सांगितले की, मत्स्यव्यवसाय विभाग आणि बीएसएनएल यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. खोल समुद्रात मोबाईल नेटवर्क उपलब्ध नसल्याने मच्छिमारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सॅटेलाईट फोनमुळे (Satellite Phone) कोणत्याही परिस्थितीत किनाऱ्याशी संपर्क साधणे, आपत्कालीन प्रसंगी तातडीने मदत मागविणे तसेच हवामान आणि सुरक्षेसंदर्भातील सूचना वेळेवर मिळवणे शक्य होणार आहे.

https://prahaar.in/2026/07/28/nitesh-rane-the-modi-government-will-not-spare-those-attempting-to-bring-about-ghazwa-e-hind/

या सुविधेमुळे इनकमिंग आणि आउटगोइंग अशा दोन्ही प्रकारच्या कॉलची सुविधा उपलब्ध राहणार आहे. बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी ग्लोबल सॅटेलाईट फोन (Satellite Phone) सर्व्हिस (GSPS) चे सादरीकरण करत समुद्रातील दुर्गम भागातही अखंड संपर्क कसा राखता येईल, याची माहिती दिली. (Fishing)

मंत्री नितेश राणे म्हणाले की, “राज्यातील मच्छिमारांचे प्राण आणि उपजीविका सुरक्षित ठेवणे ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. सॅटेलाईट फोन सुविधा मच्छिमारांसाठी जीवनदायी संपर्क व्यवस्था ठरेल. या माध्यमातून समुद्रातील सुरक्षा, बचावकार्य आणि संप्रेषण अधिक प्रभावी होईल.” (kokan)

सॅटेलाईट फोन सुविधेमुळे मत्स्य नौकांचा किनाऱ्याशी सातत्यपूर्ण संपर्क राहणार असून, शोध आणि बचाव मोहिमांना गती मिळेल. खराब हवामान, यांत्रिक बिघाड किंवा वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मागविणे सुलभ होणार आहे. तसेच हवामानातील बदल आणि समुद्री सुरक्षेच्या सूचना मच्छिमारांपर्यंत वेळेवर पोहोचवता येणार असल्याने अपघातांचे प्रमाण कमी करण्यास मदत होईल. (Fisherman)

‘मच्छिमार सुरक्षा प्रथम’ या धोरणानुसार आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यावर राज्य शासनाचा भर असून, या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील मत्स्यव्यवसाय अधिक सुरक्षित, आधुनिक आणि तंत्रज्ञानाधिष्ठित करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here