Home ब्रेकिंग न्यूज Supriya Sule : ‘आधी तटकरे, मग सुप्रिया सुळे’… अमित शाहांच्या भेटींमुळे राजकीय चर्चांना उधाण; नेमकी काय झाली चर्चा?

Supriya Sule : ‘आधी तटकरे, मग सुप्रिया सुळे’… अमित शाहांच्या भेटींमुळे राजकीय चर्चांना उधाण; नेमकी काय झाली चर्चा?

0
Supriya Sule : ‘आधी तटकरे, मग सुप्रिया सुळे’… अमित शाहांच्या भेटींमुळे राजकीय चर्चांना उधाण; नेमकी काय झाली चर्चा?

नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना राजधानी दिल्लीत घडलेल्या दोन महत्त्वाच्या भेटींनी महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतल्यानंतर काही वेळातच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीही अमित शाह यांची भेट घेतली. या सलग घडलेल्या भेटींमुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

विशेष म्हणजे, केंद्र सरकारच्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग आला असतानाच या भेटी झाल्याने त्यांना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) एनडीएमध्ये (NDA) सहभागी होणार असल्याच्या चर्चाही सुरू असल्याने या घडामोडीकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.

https://prahaar.in/2026/07/27/ram-mandir-case-new-sit-constituted-following-supreme-court-directive/

सुनील तटकरे यांची अमित शाहांशी चर्चा :

सुनील तटकरे यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची माहिती स्वतः ‘एक्स’ (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिली. त्यांनी विविध विषयांवर चर्चा झाल्याचे नमूद केले. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार संभाव्य केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारावरही चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चर्चेनुसार, मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसला एक मंत्रिपद मिळू शकते. या पदासाठी प्रफुल्ल पटेल किंवा पार्थ पवार यांच्या नावांची चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

तटकरेनंतर सुप्रिया सुळेही शाहांच्या भेटीला :

तटकरे यांच्या भेटीनंतर सुप्रिया सुळे यांनीही अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत बीडचे खासदार बजरंग सोनवणे उपस्थित होते. या भेटीबाबत स्पष्टीकरण देताना सांगण्यात आले की, १० ऑगस्ट रोजी दिल्लीत आयोजित रेवती सुळे यांच्या रिसेप्शनचे निमंत्रण देण्यासाठी सुप्रिया सुळे अमित शाह यांना भेटल्या होत्या. तसेच खासदार बजरंग सोनवणे यांनी बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबतचे निवेदन अमित शाह यांना दिले.

https://prahaar.in/2026/07/28/property-cards-should-be-distributed-to-villagers-after-rectifying-errors-in-the-town-planning-schemes-of-the-naina-area-chief-minister-fadnavis/

बजरंग सोनवणे यांनी काय सांगितले?

बजरंग सोनवणे यांनी पत्रकारांशी बोलताना या भेटीबाबत सुरू असलेल्या राजकीय चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, “ही नियमित भेट होती. रेवती सुळे यांच्या रिसेप्शनचे निमंत्रण देण्यासाठी आम्ही आलो होतो. त्याचबरोबर माझ्या मतदारसंघातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नांवरही केंद्रीय गृहमंत्र्यांशी चर्चा केली.” त्यांनी पुढे सांगितले की, बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती, तसेच काही जणांवर खोटे गुन्हे दाखल होत असल्याच्या तक्रारींबाबतही अमित शाह यांचे लक्ष वेधण्यात आले.

राजकीय चर्चांना उधाण :

सलग झालेल्या या दोन भेटींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. एकीकडे मंत्रिमंडळ विस्ताराच्या शक्यता, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांबाबत सुरू असलेल्या राजकीय चर्चांच्या पार्श्वभूमीवर या भेटींना वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र, दोन्ही बाजूंनी या भेटी नियमित आणि औपचारिक असल्याचे सांगितल्याने राजकीय तर्कवितर्कांना अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here