Home ब्रेकिंग न्यूज Kurla LBS Junction Waterlogging : कुर्ला एलबीएस जंक्शनवरील तुंबणाऱ्या पाण्याची समस्या मिटणार

Kurla LBS Junction Waterlogging : कुर्ला एलबीएस जंक्शनवरील तुंबणाऱ्या पाण्याची समस्या मिटणार

0
Kurla LBS Junction Waterlogging : कुर्ला एलबीएस जंक्शनवरील तुंबणाऱ्या पाण्याची समस्या मिटणार

– पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांचा आकार वाढवणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : कुर्ला काळे मार्ग तसेच सोनापूर लेन एल.बी.एस. मार्ग जंक्शन येथे पावसाळ्यात होणारी पूरपरिस्थिती आता थांबणार आहे. येथील पावसाळी पाण्याचा निचरा करणाऱ्या नाल्यांची क्षमता कमी असल्याने या पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे मिठी नदीने पूररेषा गाठल्यास किंवा मुसळधार पाऊस कोसळल्यास याठिकाणी भविष्यात पाणी तुंबण्याचे प्रमाण कमी होण्याची दाट शक्यता आहे. (Kurla LBS Junction Waterlogging)

कुुर्ला एल.बी.एस. मार्ग येथील सोनापूर लेन जंक्शन तसेच, काळे मार्ग येथील काजूपाडा पाईपलाईन रस्ता जंक्शन येथे पावसाळी पाणी साचून दरवर्षी पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होते. येथून पावसाळी पाण्याचा निचरा या दोन्ही मार्गावरील रस्त्यालगतच्या पर्जन्य जलवाहिन्यांचे आकारमान आवश्यक असलेल्या आकारमानापेक्षा कमी आहे. म्हणजेच या दोन्ही रस्त्यालगतच्या सद्यस्थितीत असलेल्या पर्जन्य जल वाहून नेण्याची क्षमता कमी असल्याकारणाने या वाहिन्यांमधून पावसाळी पाण्याचा निचरा पूर्णपणे तथा व्यवस्थित होण्यास खुप अडथळा निर्माण होतो. (Kurla LBS Junction Waterlogging)

https://prahaar.in/2026/07/28/commuters-once-again-using-the-moving-walkway-at-grant-road-nana-chowk-skywalk/

कुर्ला विभाग वर्षाप्रवणक्षेत्रापैकी या कामामध्ये वर्षाप्रवणक्षेत्र क्र. ४०८ यामध्ये विखुरलेल्या ठाणे कॅबीन नाला प्रणाली ठाणे कॅबीन नगर नाल्यालगतच्या काळे मार्ग व सोनापूर लेन रस्त्यालगतच्या असलेल्या पजवा पेटीकांचे सुधारणा, पुनर्रचना व बांधकाम करण्याचे काम प्रस्तावित करण्यात आले आहे. या ठिकाणातील बहुतांश भागातील पावसाचे पाणी वरच्या बाजुने उप नाला प्रणालीमधून म्हणजेच सुंदरबाग नाला काजूपाडा पाईपलाईन रस्त्यालगतच्या काळे मार्गावरील रस्त्यालगतच्या पर्जन्य जलवाहिन्या व एल. बी. एस. मार्गाच्या रस्त्यालगतच्या पर्जन्य जलवाहिन्यांमधून वाहत येऊन मिठी नदीला जोडलेल्या अशोक लेलँड पातमुखाला जाऊन मिळते. एम.डब्ल्यु. एच (इं.) प्रा.लि. या सल्लागाराद्वारे शिफारस केल्यानुसार हाती घेण्यात आलेली आहेत. (Kurla LBS Junction Waterlogging)

https://prahaar.in/2026/07/28/transform-the-historic-site-of-tiffin-box-exchange-opposite-churchgate-railway-station-into-a-mumbai-dabbawala-tourist-centre/

पर्जन्य जलवाहिन्यांची पनर्रचना, सुधारणा व बांधकाम मध्यवर्ती यंत्रणेमार्फत करणे आवश्यक आहे. ज्यामुळे पावसाळी पाण्याचा सहज व व्यवस्थित निचरा होऊ शकते. भविष्यात कोणतीही जिवितहानी वा मालमत्तेचे नुकसान होणे टाळता येईल. या दृष्टीकोनातून हे काम हाती घेण्यात आले असून यासाठी नव्याने कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. यासाठी साई सिध्दी इन्फ्रास्टक्चर यांची निवड करण्यात आली असून यासाठी तेरा कोटी एकोणीस लाख खर्च करण्यात येणार आहे. (Kurla LBS Junction Waterlogging)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here