Home ताज्या घडामोडी Special Intensive Revision : विशेष सखोल पुनरिक्षण १०० टक्के पूर्ण करण्यात चिपळूण राज्यात प्रथम

Special Intensive Revision : विशेष सखोल पुनरिक्षण १०० टक्के पूर्ण करण्यात चिपळूण राज्यात प्रथम

0
Special Intensive Revision : विशेष सखोल पुनरिक्षण १०० टक्के पूर्ण करण्यात चिपळूण राज्यात प्रथम

रत्नागिरी : मतदारयादीच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचे काम १०० टक्के पूर्ण करणारा रत्नागिरी जिल्ह्यातील ‘२६५ – चिपळूण’ हा राज्यातील पहिला मतदारसंघ बनला आहे. चिपळूणचे उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी आकाश लिगाडे यांनी याबद्दलची माहिती दिली. अहोरात्र काम करणारे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बीएलओ यांचा या यशात सिंहाचा वाटा असल्याची प्रतिक्रिया लिगाडे यांनी व्यक्त केली आहे. याआधी १०० टक्के पुनरिक्षण पूर्ण करणारे राज्यातील पहिले गाव बनण्याचा मान चिपळूण तालुक्यातल्याच मौजे टेरव बुद्रुक या गावाने पटकावला होता.(Ratnagiri)

https://prahaar.in/2026/07/27/160-officers-promoted-in-the-registration-and-stamp-department-major-decision-by-the-revenue-department/

चिपळूण विधानसभा मतदारसंघात चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यातील ३३६ मतदान केंद्रांचा समावेश असून, मतदारसंख्या दोन लाख ७१ हजार ४३३ आहे. त्यात एक लाख ३८ हजार ६७५ स्त्रिया, तर एक लाख ३२ हजार ७५८ पुरुषांचा समावेश आहे. विशेष सखोल पुनरिक्षण प्रक्रियेत ९०.४० टक्के गणना प्रपत्रांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे. ९.५६ टक्के गणना प्रपत्रे जमा करण्यासारखी नव्हती (अनकलेक्टेबल). तसेच, मॅपिंग होऊ न शकल्याचे प्रमाण २.७९ टक्के एवढे आहे. आता आठ ऑगस्टपर्यंतच्या उर्वरित कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या पातळीवर फेरपडताळणी आणि मॅपिंगचा प्रयत्न केला जाणार आहे.

https://prahaar.in/2026/07/27/1-tb-of-bank-of-baroda-data-stolen-customer-information-personal-details-and-documents-available-on-the-dark-web/

डिजिटायझेशन झालेल्या गणना प्रपत्रांची तपासणी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पातळीवर केली जाणार आहे. सहायक आणि अतिरिक्त सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांपासून त्यांना साह्य करणाऱ्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांतून हे काम १०० टक्के पूर्ण करता आले, असे आकाश लिगाडे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here