Home ब्रेकिंग न्यूज Ahilyanagar : नीट परीक्षेत कमी गुण मिळाले अन् विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलले ; सुसाईड नोटमध्ये लिहिलं आत्महत्येचं कारण

Ahilyanagar : नीट परीक्षेत कमी गुण मिळाले अन् विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलले ; सुसाईड नोटमध्ये लिहिलं आत्महत्येचं कारण

0
Ahilyanagar : नीट परीक्षेत कमी गुण मिळाले अन् विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलले ; सुसाईड नोटमध्ये लिहिलं आत्महत्येचं कारण

Ahilyanagar : नीट परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्याच्या नैराश्यातून १९ वर्षीय विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात घडली आहे. डॉक्टर होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिल्याने विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Karjat Suicide News)

https://prahaar.in/2026/07/27/seattle-food-festival-firing-chaos-and-terror-as-indiscriminate-shooting-erupts-at-a-popular-food-festival-in-seattle-atmosphere-of-fear-in-the-area/

राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या

कर्जत तालुक्यातील जलालपूर येथील अंकिता सुरेश सांगळे हिने २५ जुलै रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यावेळी तिचे वडील आणि भाऊ पंढरपूर येथे दर्शनासाठी गेले होते, तर आई घरकामात व्यस्त होती. अंकिता अभ्यासासाठी स्वतंत्र खोलीत होती. बराच वेळ बाहेर न आल्याने आईने खोलीत जाऊन पाहिले असता ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. त्यानंतर तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. अण्णा सांगळे यांच्या खबरीवरून आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Karjat Suicide News)

https://prahaar.in/2026/07/27/n-another-date-for-the-kumbh-mela-bath-announced/

अंकिताने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत काय म्हटलं?

आई वडील आणि भावाला उद्देशून लिहिलेल्या चिठ्ठीत अंकिताने लिहिलंय की , “तुम्ही मला एवढा जीव लावला, मी तुमची एकही इच्छा पूर्ण करू शकली नाही. मम्मी तू तर प्रत्येक संकटात मैत्रीण म्हणून साथ दिली. दादा, तू पण मला खूप साथ दिली. मम्मी पप्पांपेक्षा तू जास्त जीव लावला. माझ्या आत्महत्येला तुम्ही जबाबदार नाही आहात. तुम्ही जे सुख दिलंय, ते मी कधीच विसरू शकत नाही. दादा तू मम्मी पप्पांना चांगलं सांभाळ, त्यांना कोणत्याच गोष्टीची कमी पडू देऊ नको. तुम्ही आनंदी राहा, माझं काही चुकलं असेल तर माफ करा. आधीच मी नीटचा अभ्यास करत होते. तेव्हा तुम्ही सगळं काही त्याग केलं. पण मी काय केलं? मी तुमची इच्छा पूर्ण करू शकले नाही. आता कसला त्रास करून घेऊ नका, आनंदी राहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here