ग्लासगो : भारताची स्टार वेटलिफ्टर आणि ऑलिम्पिक पदकविजेती मीराबाई चानू हिने ग्लासगो २०२६ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिला ४८ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावत इतिहास रचला. या विजयासह चानूने सलग तिसऱ्यांदा राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला. तसेच ग्लासगो २०२६ मध्ये भारताचे पहिले सुवर्णपदकही तिच्याच नावावर जमा झाले. (Mirabai Chanu)
View this post on Instagram
स्पर्धेच्या स्नॅच प्रकारात मीराबाईने ८५ किलो वजन उचलत नवा राष्ट्रकुल विक्रम प्रस्थापित केला. त्यानंतर क्लीन अँड जर्कमध्ये सुरुवातीचा ८२ किलोचा प्रयत्न अपयशी ठरला. मात्र दुसऱ्या प्रयत्नात तिने हे वजन सहज उचलले. तिसऱ्या प्रयत्नात पुन्हा ८५ किलो वजन उचलून तिने स्पर्धा आणि राष्ट्रकुल विक्रम आपल्या नावावर केला. याच जोमात चानूने १०५ किलो वजन उचलण्याचा धाडसी निर्णय घेतला. प्रेक्षकांच्या जल्लोषात तिने हे वजन यशस्वीरीत्या डोक्यावर उचलत सुवर्णपदक निश्चित केले. या कामगिरीने संपूर्ण स्टेडियममध्ये भारताचा तिरंगा अभिमानाने फडकला. मीराबाई चानूने यापूर्वी २०१८ आणि २०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही सुवर्णपदके जिंकली होती. आता २०२६ मध्येही सुवर्ण जिंकत तिने राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदकांची हॅटट्रिक केली आहे. भारतीय वेटलिफ्टिंग इतिहासातील ही एक उल्लेखनीय कामगिरी मानली जात आहे.
https://prahaar.in/2026/07/26/free-healthcare-services-provided-to-over-7-47-lakh-warkaris-during-the-ashadhi-wari-effective-treatment-for-various-ailments-including-diabetes-fever-and-high-blood-pressure/
मीराबाईची विक्रमी कामगिरी
महिला ४८ किलो गटात सुवर्णपदक
स्नॅचमध्ये ८५ किलोसह राष्ट्रकुल विक्रम
क्लीन अँड जर्कमध्ये १०५ किलोची यशस्वी लिफ्ट
सलग तिसरे राष्ट्रकुल सुवर्णपदक
ग्लासगो २०२६ मधील भारताचे पहिले सुवर्ण
भारतासाठी अभिमानाचा क्षण
https://prahaar.in/2026/07/26/rishikant-singla-wins-silver-medal-at-the-commonwealth-games/
राष्ट्रकुल स्पर्धा २०२६ – भारतीय पदकविजेते
- झंडू कुमार – पुरुषांचे हेवीवेट – पॅरा पॉवरलिफ्टिंग – कांस्य पदक
- ऋषिकांत सिंग – पुरुष ६० किलो वजनी गट – वेटलिफ्टिंग – रौप्य पदक
- मीराबाई चानू – महिला ४८ किलो वजनी गट – वेटलिफ्टिंग – सुवर्ण पदक