Home ताज्या घडामोडी Healthy Food Oats Curd Rice : ओट्स दही भात, एक चविष्ट आणि आरोग्याला लाभदायी पदार्थ

Healthy Food Oats Curd Rice : ओट्स दही भात, एक चविष्ट आणि आरोग्याला लाभदायी पदार्थ

0
Healthy Food Oats Curd Rice : ओट्स दही भात, एक चविष्ट आणि आरोग्याला लाभदायी पदार्थ
Otas curd rice

ओट्स दही भात (Oats Curd Rice) एक रुचकर आणि आरोग्यासाठी लाभदायी असा पदार्थ आहे. फक्त एक बाउल ओट्स दही भात खाल्ला तरी त्यातून २३ ग्रॅम प्रथिने (Protein) मिळतात. याच कारणामुळे ओट्स दही भात एक चवदार, पौष्टिक आणि वजन कमी करण्यासाठी उत्तम पदार्थ आहे. चला जाणून घेऊ ओट्स दही भात तयार करण्याची पाककृती.

https://prahaar.in/2026/07/25/srpf-jawan-commits-suicide-by-shooting-himself-stir-in-the-area/

साहित्य (Ingredients):

भाजलेले ओट्स: ३ चमचे
चिया बिया (Chia Seeds): १ चमचा
ग्रीक योगर्ट (दही): १०० ग्रॅम
दूध: २ चमचे
पाणी: २ चमचे
वाफवलेले मोड आलेले धान्य: ५० ग्रॅम
बारीक चिरलेले गाजर, काकडी : १/८ कप
मीठ: चवीनुसार
तेल: १ चमचा
मोहरी: १ चमचा
कढीपत्ता: ८ ते १० पाने
शेंगदाणे: २ चमचे

कृती:

मिश्रण तयार करणे: एका काचेच्या बरणीत किंवा भांड्यात भाजलेले ओट्स, चिया सीड्स, ग्रीक योगर्ट(दही) आणि दूध एकत्र करून व्यवस्थित मिसळा. बरणीचे झाकण लावून हे मिश्रण किमान ३ ते ४ तास किंवा रात्रभर फ्रिजमध्ये ठेवा यामुळे ओट्स आणि चिया सीड्स दही-दूध शोषून घेऊन छान मऊ होतील.

सकाळी फ्रिजमधून मिश्रण बाहेर काढा. मिश्रण थोडे घट्ट वाटल्यास, त्यात थोडे पाणी घालून कन्सिस्टन्सी योग्य करा. आता यामध्ये उकडलेले मोड आलेले धान्य, चिरलेले गाजर, काकडी आणि चवीनुसार मीठ घालून छान एकत्र करा.

फोडणी तयार करणे : एका लहान कढईत १ छोटा चमचा तेल गरम करा. त्यात मोहरी, कढीपत्ता आणि शेंगदाणे टाका. शेंगदाणे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. आता ही गरमागरम फोडणी तयार केलेल्या ओट्सच्या मिश्रणावर ओता. लगेच तुमचा थंडगार, कुरकुरीत आणि प्रथिनांनी भरपूर ओट्स दही भात तयार होईल.

https://prahaar.in/2026/07/25/bmc-part-of-a-mhada-building-collapses-at-masjid-bunder-6-rescued-2-injured/

महत्त्वाच्या टिप्स:

पचनक्रिया सुधारण्यासाठी : नेहमी वाफवलेले ओट्स आणि मोड आलेले धान्य वापरा.
योग्य पद्धत : हा पदार्थ एकदम थंडगार सर्व्ह करा, त्यामुळे त्याची चव दुप्पट वाढते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here