Home ताज्या घडामोडी Weight Loss Tips : वजन कमी करायचंय पण चवीशी तडजोड नको ? दुधी भोपळ्यापासून बनवा हे ४ भन्नाट पदार्थ

Weight Loss Tips : वजन कमी करायचंय पण चवीशी तडजोड नको ? दुधी भोपळ्यापासून बनवा हे ४ भन्नाट पदार्थ

0
Weight Loss Tips : वजन कमी करायचंय पण चवीशी तडजोड नको ? दुधी भोपळ्यापासून बनवा हे ४ भन्नाट पदार्थ
Lauki recipe

वजन कमी करायचं म्हटलं की अनेकांच्या डोळ्यांसमोर अळणी, बेचव किंवा कंटाळवाणा आहार येतो. विशेषतः दुधी भोपळा (Lauki) आरोग्यासाठी अतिशय गुणकारी मानला जात असला, तरी अनेक जण त्याचे नाव ऐकताच नाक-तोंड मुरडतात. परंतु, आता चवीशी कोणतीही तडजोड न करता तुम्ही वजनावर नियंत्रण ठेवू शकता. दुधी भोपळ्यामध्ये तब्बल ९२% पाण्याचे प्रमाण असते आणि त्यात कॅलरीज नगण्य असतात. तसेच, फायबरचे प्रमाण भरपूर असल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि वारंवार भूक लागत नाही, ज्यामुळे वजन घटण्यास मदत होते.

डाएटमध्ये दुधी भोपळ्याचा समावेश करण्यासाठी या ४ चविष्ट आणि सोप्या रेसिपीज नक्की ट्राय करा.

१. दुधी भोपळ्याचं धिरडं किंवा चिला (Bottle gourd/Lauki Chilla)

सकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी हलके आणि पौष्टिक हवे असल्यास दुधी भोपळ्याचा चिला हा सर्वोत्तम पर्याय आहे.

Recipe : किसलेल्या दुधी भोपळ्यात थोडे बेसन, चिमूटभर हळद, ओवा, हिरवी मिरची आणि चवीनुसार मीठ घाला. थोडे पाणी टाकून घट्ट मिश्रण (Batter) तयार करा. तव्यावर हलके तेल लावून डोशाप्रमाणे पसरवा आणि दोन्ही बाजूंनी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.

https://prahaar.in/2026/07/25/devendra-fadnavis-chief-minister-devendra-fadnavis-leaves-immediately-for-delhi-following-dharmendra-pradhans-resignation/

२. दुधी भोपळ्याचा रायता (Bottle gourd/Lauki Raita)

रायता कोणत्याही आहाराची चव वाढवण्याचे काम करतो. वेट लॉस डाएटसाठी दुधी भोपळ्याचा रायता खूप फायदेशीर आहे.

Recipe : दुधी भोपळा किसून उकडून घ्या आणि थंड होऊ द्या. त्यानंतर घट्ट व ताज्या दह्यामध्ये हा उकडलेला भोपळा मिसळा. वरून भाजलेली जिरे पूड, काळं मीठ आणि थोडी कोथिंबीर टाका. दुधी भोपळ्याचा रायता तयार आहे.

३. दुधी भोपळ्याचे सूप (Bottle gourd/Lauki Soup)

संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी किंवा रात्रीच्या हलक्या जेवणासाठी दुधीचे सूप उत्तम पर्याय आहे.

Recipe : दुधी भोपळा, टोमॅटो, थोडे आले आणि लसूण कुकरमध्ये एक शिट्टी होईपर्यंत शिजवून घ्या. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. हे मिश्रण गाळून पॅनमध्ये उकळा आणि वरून काळी मिरी पूड व लिंबाचा रस घाला.

https://prahaar.in/2026/07/25/mla-devyani-farande-furious-over-jayakwadi-discharge/

४. जिरा-लौकी भाजी (Bottle gourd/Jeera Lauki Sabzi)

कमी तेल आणि मसाल्यांमध्ये बनवलेली ही साधी अन् सोपी भाजी आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहे.

Recipe : एका पॅनमध्ये अर्धा चमचा देशी तूप किंवा तेल गरम करा. त्यात जिरे, हिंग आणि हिरव्या मिरचीची फोडणी द्या. त्यानंतर बारीक कापलेला दुधी भोपळा, हळद आणि मीठ घालून झाकण ठेवा. ही भाजी दुधीच्या स्वतःच्याच पाण्यात वाफेवर छान शिजते.

जर तुम्हालाही आरोग्यदायी पद्धतीने वजन कमी करायचे असेल, तर दुधी भोपळ्याच्या या पाककृती नक्की करून पहा आणि खाऊन अनुभवा. यामुळे वजन कमी होण्यास नक्की मदत होईल.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here