शरीराची स्वच्छता राखणे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच कानांची काळजी घेणे देखील अत्यंत गरजेचे असते. मात्र, कानातील मळ (Earwax) स्वच्छ करताना अनेकदा लोक नकळत अनेक चुका करतात. विचार न करता विविध टोकदार वस्तू कानात घालण्याची सवय अनेकांना असते. तुम्हीही यापैकी एक असाल, तर आजच ही वाईट सवय बदलावी. कारण कानातील मळ चुकीच्या पद्धतीनं काढल्यानं ऐकण्याच्या क्षमतेला धोका निर्माण होऊ शकतो आणि विविध गंभीर समस्या उद्भवू शकतात. कानातला मळ सुरक्षित रितीनं काढण्यासाठी नेहमी कान किंवा नाक-घसा तज्ज्ञांचा (ENT Specialist) सल्ला घेणं आवश्यक आहे.
https://prahaar.in/2026/07/25/tet-paper-2026-case-mastermind-of-the-tet-paper-leak-finally-arrested-thane-police-took-action-in-bihar/
टोकदार वस्तूंचा वापर ठरू शकतो धोकादायक
कानातील मळ हा शरीराचा एक नैसर्गिक भाग असून तो कानाचे रक्षण करण्याचे काम करतो. परंतु, जेव्हा यात वाढ होते, तेव्हा तो काढताना अनेक जण हेअर पिन, सेफ्टी पिन, काड्या किंवा इयर बड्सचा सर्रास वापर करतात. कानात अशा प्रकारच्या टोकदार वस्तू घालणे अत्यंत घातक ठरू शकते. यामुळे कानाचा पडदा (Eardrum) डॅमेज होण्याची शक्यता असते, ज्यामुळे कायमस्वरूपी ऐकण्याचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे डॉक्टरांच्या मते, कानात कोणतीही टोकदार वस्तू घालणे पूर्णपणे टाळले पाहिजे.
https://prahaar.in/2026/07/25/commonwealth-games-2026-india-opens-its-medal-account-zandu-kumar-wins-bronze-in-para-powerlifting/
मळ काढण्याचे काही सोपे घरगुती उपाय
जर तुम्हाला घरच्या घरी सुरक्षितपणे मळ सैल करायचा असेल, तर खालील काही सोपे उपाय करता येऊ शकतात:
मीठ आणि कोमट पाणी: कानातला मळ काढण्यासाठी ही एक सोपी आणि प्रभावी पद्धत आहे. कान स्वच्छ करण्यासाठी कोमट पाण्यात अर्धा चमचा मीठ मिसळा. या पाण्यात कापसाचा एक तुकडा भिजवून तो काही वेळ कानात ठेवा. यामुळे कानातील मळ सहजपणे बाहेर येण्यास मदत होते.
कोमट तेलाचा वापर: खोबरेल तेल किंवा बदामाचं तेल थोडे कोमट करा आणि कापसाच्या साहाय्यानं कानात दोन ते तीन थेंब टाका. ते ५ ते १० मिनिटं तसंच राहू द्या. त्यानंतर डोकं एका बाजूला कलवा, ज्यामुळे मळ बाहेर येईल.
वाफ घेणं: एका भांड्यात गरम पाणी घेऊन डोक्यावर टॉवेल झाकून वाफ घ्या. यामुळे कानात साचलेला कडक मळ सैल होऊन बाहेर पडण्यास मदत होते.
हायड्रोजन पेरॉक्साइड: या पद्धतीचा वापर केवळ तज्ज्ञांच्या देखरेखीखालीच करावा. समप्रमाणात पाणी आणि हायड्रोजन पेरॉक्साइड एकत्र मिसळून त्याचे काही थेंब कानात टाकावेत आणि काही वेळानंतर टिश्यू पेपरने कान स्वच्छ करावा.
https://prahaar.in/2026/07/25/minister-ravneet-singh-bittu-major-development-in-the-modi-cabinet-resignation-of-minister-of-state-for-railways-ravneet-singh-bittu-speculation-about-a-reshuffle-intensifies/
कान स्वच्छ करताना घ्यायची काळजी आणि खबरदारी
- जर कानात तीव्र वेदना होत असतील, खाज सुटत असेल किंवा ऐकण्यास त्रास होत असेल, तर स्वतः प्रयोग न करता तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- इअर स्वॅब्सचा अतिवापर करणे टाळा.
- क्लिप्स, सेफ्टी पिन किंवा आगकाड्यांचा वापर अजिबात करू नका.
तज्ज्ञांच्या मते, कान ही अतिशय संवेदनशील अवयव असून त्याची काळजी घेताना योग्य ती खबरदारी बाळगणे नेहमीच हिवाळ्याच्या किंवा कोणत्याही ऋतूत फायदेशीर ठरते.