महापालिका सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी दिली माहिती
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या वाढदिवसांचे औचित्य साधून मुंबईतील ३० वर्षांपेक्षा अधिक वयोमान असलेल्या महिलांसाठी स्तन कर्करोग (Breast Cancer) तपासणी शिबिरांचे आयोजन २२ जुलै २०२६ रोजी मुंबईत २९८ ठिकाणी करण्यात आले. याशिबिरांत तब्बल २७ हजार ८६६ महिलांची स्तन कर्करोग तपासणी करण्यात आली आहे. त्यात तब्बल १२७९ महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग झाल्याचे तपासणीत दिसून आले असून सर्व महिलांवरील उपचार (Treatment) महापालिकेच्यावतीने (BMC) मोफत केले जाणार आहे. यासाठी महापालिकेच्यावतीने महापौर (Mayor) वैद्यकीय निधी तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा वापर करून महिलांवरील याचे पुढील उपचार मोफत केले जातील असे महापालिका सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी जाहीर केले.
https://prahaar.in/2026/07/25/ashadhi-ekadashi-the-mahapuja-and-mahabhishek-were-performed-by-mumbai-mayor-smt-ritu-tawde-at-the-prati-pandharpur-vitthal-temple-wadala/
भाजपच्या सर्व नगरसेवकांसह इतर प्रभागांमध्येही नगरसेवकांच्या माध्यमातून राबवलेल्या या लाडकी बहिण मुख्यमंत्र्यांची, घेऊ काळजी तिच्या आरोग्याच्या या अंतर्गत घेतलेल्या या शिबिरात तब्बल २७ हजार ८६६ महिलांची स्तन कर्करोग तपासणी करण्यात आली आहे. आणि एकाच दिवशी एवढ्या मोठ्याप्रमाणात तपासणी केल्यामुळे याची नोंदणी इंडियन बूक रेकॉर्ड तथा आशिया बूक रेकॉर्डमध्ये घेण्यात आली आहे. या विशेष मोहिमेबाबत सार्वजनिक आरोग्य समितीच्या बैठकीमध्ये नगरसेवक, आरोग्य विभागाचे अधिकारी यांचे विशेष आभार मानण्यात आले आहे. याबाबत बोलतांना सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी आज समितीच्या बैठकीत याबाबत अभिनंदन प्रस्ताव मांडण्यात आला होता. या मोहिमेमध्ये २९८ ठिकाणी हे तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते आणि यामध्ये २७ हजार ८६६ महिलांनी सहभाग घेतला होता. यात १२७६ महिलांमध्ये या आजाराची लक्षणे दिसून आली आहेत. या तपासणी मोहिमेत ३६० डॉक्टर्स. ९०० पेक्षा अधिक पॅरामेडीकल डॉक्टर्स, २५०० पेक्षा अधिक आरोग्य सेविका तसेच आशा वर्कर्स आदींचे सहकार्य लाभले आहे.
ज्या महिलांमध्ये या आजारांचे लक्षण दिसून आले आहे, त्यांच्यावरील मेमोग्रॉफी तसेच पुढील उपचार हे मोफत केले जाणार आहे. टाटा रुग्णालय आणि नाना पालकर स्मृती ट्रस्टच्यावतीने हे उपचार केले जाणार असून यासाठी लागणारा निधी महापौर वैद्यकीय सहायता निधी तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून उपलब्ध करून देत किंवा सीएसआर निधीतून उपलब्ध करून देत पूर्णपणे मोफत उपचार केले जाणार आहे. यासर्व महिलांना नवसंजीवनी देण्याचे काम महापालिकेच्यावतीने केले जाणार आहे. याची लक्षणे आढळून आलेल्या महिला या मानसिकदृष्ट्या खचलेल्या आहेत. त्यांचे मनोबल उचावून त्यांना उपचारासाठी तयार करणे आणि त्यासाठी याची मानसिकता तयार करणे आदींसाठी तज्ज्ञांच्या माध्यमातून समुपदेशन केले जाणार आहे,असेही भांदिर्गे यांनी स्पष्ट केले.