गंगटोक : सिक्कीममधील एनएचपीसीच्या तीस्ता स्टेज-6 जलविद्युत प्रकल्पाच्या बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यात मिथेन वायू गळतीमुळे झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 25 कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
ही दुर्घटना सोमवारी दुपारी बोगद्याच्या आत मिथेन वायू गळती झाल्याने घडली होती. त्यानंतर सोमवारपासून बचाव आणि शोध मोहीम सातत्याने सुरू होती. एनएचपीसीच्या अधिकृत माहितीनुसार, दुर्घटनेच्या वेळी बोगद्याच्या आत 25 कामगार अडकले होते.
https://prahaar.in/2026/07/23/impact-of-middle-east-tensions-on-the-oil-market-oil-prices-have-risen-again-due-to-the-delay-in-the-iran-us-deal-brent-crude-has-crossed-the-96-mark/
बोगद्यात अडकलेल्या कामगारांच्या शोधासाठी सुरू असलेले बचाव आणि मदतकार्य गुरुवारपर्यंत सुरू होते. अत्यंत कठीण आणि धोकादायक परिस्थितीत बचाव पथकांनी सातत्याने काम करत अडकलेल्या कामगारांचा शोध घेतला. रात्री सुमारे 10 वाजता पश्चिम बंगालमधील आसनसोल येथून ईस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडचे (ECL) दुसरे विशेष बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तातडीने बचाव मोहिमेत सहभाग घेतला. विविध यंत्रणांच्या पथकांनी परस्पर समन्वयाने मध्यरात्रीपर्यंत मदत व बचावकार्य सुरू ठेवले.
https://prahaar.in/2026/07/23/61900-farmers-will-receive-the-benefit-of-the-loan-waiver-tomorrow/
मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, बोगद्यातून आतापर्यंत 25 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून सर्व मृतदेह सुरक्षितपणे बाहेर आणण्यात आले आहेत.नामची जिल्हा प्रशासन तसेच संबंधित सर्व यंत्रणा परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत. बचाव कार्यात सहभागी पथकांना आणि मृत कामगारांच्या कुटुंबीयांना आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून दिली जात आहे.