मध्यस्थ कमी होऊन सेवा अधिक पारदर्शक होणार
https://prahaar.in/2026/07/23/pmfby-revised-pradhan-mantri-fasal-bima-yojana-implemented-in-maharashtra-for-2026-27-appeal-made-apply-by-july-31/
मुंबई : महाराष्ट्र शासन आणि केंद्रीय सहकार मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी ‘भारत टॅक्सी’ सेवेचा लोकार्पण सोहळा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे उत्साहात पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या वाहतूक सेवेचा शुभारंभ करण्यात आला. एकाच मोबाईल ॲपवरून कार, ऑटो-रिक्षा आणि बाईक टॅक्सी बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या या उपक्रमामुळे प्रवासी आणि चालक थेट जोडले जाणार असून, मध्यस्थांची साखळी मोडीत निघून ही सेवा अधिक पारदर्शक, सुलभ आणि किफायतशीर ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी या वेळी व्यक्त केला.
https://prahaar.in/2026/07/23/residents-along-the-banks-of-the-godavari-river-should-remain-alert-dr-pravin-gedam/
या लोकार्पण सोहळ्याला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार मंदा म्हात्रे, आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह सहकार व परिवहन विभागातील वरिष्ठ मान्यवर उपस्थित होते. केंद्रीय सहकार मंत्रालयाची ही अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ आणि देशातील ७ प्रमुख राष्ट्रीय सहकारी संस्थांच्या सहकार्याने राबवली जात आहे. पहिल्या टप्प्यात मुंबई आणि पुणे या दोन प्रमुख शहरांमध्ये ही सेवा सुरू करण्यात येत आहे. या ॲप-आधारित कॅब सेवांसाठी राज्य सरकारने एग्रीगेटर धोरण अंतिम केले असून कायदेशीर चौकटही तयार केली आहे. संपूर्ण आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुण्याचे सहकार आयुक्त व निबंधक यांची नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
https://prahaar.in/2026/07/23/rampaging-floods-in-assam-10-dead-in-24-hours-sivasagar-and-jorhat-worst-hit/
‘भारत टॅक्सी’चे भाडे पारंपरिक काळी-पिवळी टॅक्सीच्या धर्तीवर निश्चित करण्यात आले आहे. पहिल्या १.५ किलोमीटर अंतरासाठी ३१ रुपये आणि त्यानंतर प्रति किलोमीटर २१ रुपये असा दर आकारला जाईल. खासगी एग्रीगेटर कंपन्यांकडून सण-उत्सव किंवा पावसाळ्यात केली जाणारी अचानक भाडेवाढ (सर्ज प्रायसिंग) या ॲपमध्ये असणार नाही, त्यामुळे प्रवाशांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
https://prahaar.in/2026/07/23/allocation-under-samagra-shiksha-for-maharashtra-should-be-increased-education-minister-dadaji-bhuse/
प्रवाशांची पिळवणूक थांबवणारे सुरक्षित मॉडेल – मुख्यमंत्री
“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेला हा उपक्रम सहकार क्षेत्रात नवीन क्रांती घडवेल. ओला-उबरसारख्या कंपन्यांनी वाहतूक क्षेत्रात सोय निर्माण केली असली, तरी पाऊस किंवा सण-उत्सवाच्या काळात अवाजवी भाडेवाढ करून सर्वसामान्यांची लूट केली जात होती. चालकांनाही ॲपपवर राहण्यासाठी कमिशन द्यावे लागत होते. ‘भारत टॅक्सी’ हे असे मॉडेल आहे जिथे चालकांना न्याय मिळेल आणि प्रवाशांना वाजवी दरात सुरक्षित, सुखद प्रवास करता येईल,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच, या प्रकल्पामुळे नवी मुंबईतील भूमिपुत्रांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.