Accident News : एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. भीषण अपघातात प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्री ‘केली हॉटल’ हीच अपघातात मृत्यू झाला आहे. केलीने आपल्या प्रतिभेने जगभरातील प्रेक्षकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले होते. तिच्या अचानक जाण्याने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
https://prahaar.in/2026/07/22/60-of-the-work-under-the-health-scheme-should-be-carried-out-in-government-hospitals-health-minister-prakash-abitkar-issues-directives/
केली हॉटलचा कार अपघातात मृत्यू
केली हॉटलचा (Kelly Hotel) मॅलँड इथं कार अपघातात मृत्यू झाला आहे. तिच्या कुटुंबाने आणि स्कूलने तिच्या निधनाची बातमी दिली आहे. केलीचे वडील जोशुआ हॉटल यांनी ‘अमेरिकन साईन लँग्वेज’ (ASL) मध्ये फेसबुक लाईव्हद्वारे तिच्या निधनाची माहिती दिली. फ्रेडरिक काउंटी शेरीफ कार्यालयाच्या माहितीनुसार, पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. गाडी अचानक रस्त्यावरून बाजूला गेली आणि एका पुलाला धडकली. अधिकाऱ्यांच्या मते, गाडीचा अतिवेग हे या अपघाताचे एक कारण होते असे सांगितले जात आहे. गाडी चालवणाऱ्या 19 वर्षीय तरुणाला किरकोळ दुखापत झाली.
https://prahaar.in/2026/07/22/young-woman-quits-%e2%82%b935-lakh-job-and-moves-to-nashik/
‘गॉडझिला एक्स काँग: द न्यू एम्पायर’ या चित्रपटात काम
केली हॉटलने 2021 मधील ‘गॉडझिला एक्स काँग: द न्यू एम्पायर’ (Godzilla x Kong: The New Empire) या चित्रपटात जियाची भूमिका साकारली होती. जिया ही एक मूक-बधीर अनाथ मुलगी होती, जिचं ‘किंग काँग’सोबत एक अतिशय खास नातं दाखवण्यात आलं होते. त्यानंतर ती 2024 मध्ये आलेल्या ‘गॉडझिला एक्स काँग: द न्यू एम्पायर’ (Godzilla x Kong: The New Empire) मध्येही याच भूमिकेत दिसली होती.
https://prahaar.in/2026/07/22/bjp-and-congress-hold-protests-against-each-other-in-mumbai-led-by-amit-satam/
चाहत्यांना मोठा धक्का
या चित्रपटातील तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी तिला ‘सॅटर्न अवॉर्ड्स’मध्ये ‘बेस्ट परफॉर्मन्स बाय अ यंगर ॲक्टर’ (‘Best Performance by a Younger Actor’) या श्रेणीत नामांकन मिळालं होतं. 2021 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत केलीने सांगितलं होतं की, तिच्यासाठी संवाद लक्षात ठेवणं कठीण नव्हतं, पण अमेरिकन साईन लँग्वेजनुसार संवादांना जुळवून घेणं हे खूप आव्हानात्मक होतं. दरम्यान वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी केलीने आपल्या प्रतिभेने जगभरातील प्रेक्षकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले होते. तिच्या अचानक जाण्याने हॉलीवूड आणि तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.