पुनर्विकास आराखड्यासह चित्रपट धोरणाचा मसुदा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांना सादर
मुंबई(Mumbai) : गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीचा (film city) सर्वांगीण पुनर्विकास आणि महाराष्ट्राला जागतिक दर्जाचे चित्रपट निर्मिती केंद्र बनवण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे. चित्रनगरीच्या प्राथमिक पुनर्विकासाचा आराखडा आणि राज्याच्या नवीन चित्रपट धोरणाचा मसुदा चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांनी बुधवारी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्याकडे सादर केला. या नव्या आराखड्यामुळे रखडलेल्या पुनर्विकासाला गती मिळून चित्रनगरीच्या कायापालटाचा मार्ग सुकर झाला आहे.(Goregaon)
https://prahaar.in/2026/07/22/devendra-fadnavis-the-opposition-should-not-tarnish-the-countrys-image-for-the-sake-of-politics/
मंत्रालयात आयोजित या विशेष बैठकीला सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, उपसचिव महेश वाव्हळ, सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, वित्तीय सल्लागार चित्रलेखा खातू आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्यामध्ये चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी आणि डिजिटल कंटेंट निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी या पुनर्विकास आराखड्यात अत्याधुनिक स्टुडिओ संकुल, पोस्ट-प्रॉडक्शन सुविधा, व्हर्च्युअल प्रॉडक्शन स्टुडिओ, आधुनिक साउंड स्टेजेस, फिल्म टेक्नॉलॉजी सेंटर आणि पर्यटनाभिमुख सुविधांची आखणी करण्यात आली आहे.
https://prahaar.in/2026/07/22/ashadhi-ekadashi-2026-why-does-lord-pandurang-wear-fish-shaped-earrings-discover-this-secret-and-the-associated-mythological-story/
वैशिष्ट्ये काय?
– महाराष्ट्राला देशातील सर्वाधिक चित्रपटस्नेही राज्य बनवण्याच्या उद्देशाने हे नवीन धोरण आखण्यात आले आहे. हे मसुदे स्वीकारताना सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार म्हणाले की, या आराखड्याचा सविस्तर अभ्यास करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच धोरणाला अंतिम स्वरूप देऊन मंजुरी दिली जाईल.
– या प्रकल्पामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाची निर्मिती केंद्रे उभारली जाऊन राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक, रोजगारनिर्मिती आणि चित्रपट पर्यटनाल मोठी गती मिळेल, असा विश्वास शेलार यांनी व्यक्त केला.