Home देश NEET TOPPER : नीट २०२६ टॉपर आर्यन गुप्ताची विशेष मुलाखत; प्रोटेस्टवर मला काहीच बोलयचं नाही, पण…

NEET TOPPER : नीट २०२६ टॉपर आर्यन गुप्ताची विशेष मुलाखत; प्रोटेस्टवर मला काहीच बोलयचं नाही, पण…

0
NEET TOPPER : नीट २०२६ टॉपर आर्यन गुप्ताची विशेष मुलाखत; प्रोटेस्टवर मला काहीच बोलयचं नाही, पण…

Panjab : NEET 2026 परीक्षेत ७२० पैकी तब्बल ७१५ गुण मिळवून ऑल इंडिया रँक-१ (AIR 1) पटकावणारा पंजाबचा आर्यन गुप्ता हा सध्या सर्वत्र चर्चेत आहे. देशभरात सुरू असलेले NEET पेपर लीक प्रकरण आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान (Protest) त्याला एका मुलाखतीत यावर प्रश्न विचारण्यात आला. या वादावर प्रतिक्रिया देण्याऐवजी आर्यनने अतिशय समजदारीने यावर बोलणे टाळले.

https://prahaar.in/2026/07/22/young-woman-quits-%e2%82%b935-lakh-job-and-moves-to-nashik/

आंदोलनावर काय म्हणाला आर्यन?

आंदोलनाबद्दल विचारले असता आर्यन गुप्ता म्हणाला, “यावर कमेंट करण्यासाठी मी खूप लहान आहे, मला यावर काहीही बोलायचे नाही.”

मात्र, जेव्हा त्याला पेपर लीक आणि परीक्षा रद्द झाल्याच्या प्रसंगाबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्याने आपली मनःस्थिती मोकळेपणाने मांडली. तो म्हणाला, “सुरुवातीला मला खूप निराशा आली होती. जेव्हा पेपर रद्द झाला, तेव्हा माझे मन खचले होते आणि मी खूप रडलोही होतो. पण नंतर मला जाणीव झाली की जे झाले ते अन्यायकारक असले तरी, ते केवळ माझ्या एकट्यासोबत घडले नाही. माझ्यासारख्या इतर २२ लाख विद्यार्थ्यांनीही तीच वेदना सहन केली आणि ते पुन्हा परीक्षा देत आहेत. मला पुन्हा एक संधी मिळाली आहे, हे ध्यानात घेऊन मी स्वतःला सावरले आणि दररोज आपले सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला.”

https://prahaar.in/2026/07/22/delhi-metro-closes-16-stations-amid-cjp-protest-dmrc-issues-major-security-update/

अपयशावर मात कशी केली?

आर्यनने सांगितले की, “मी दुसऱ्याच दिवसापासून पुन्हा अभ्यास सुरू केला आणि आज त्याचाच परिणाम तुमच्या समोर आहे. हे यश आणि माझी ही रँक माझ्या आई-वडील, मोठा भाऊ आणि शिक्षकांच्या पाठिंब्याशिवाय शक्य नव्हती. माझे आई-वडील दोघेही डॉक्टर आहेत, त्यांनी माझी पायाभरणी मजबूत केली आणि या कठीण काळात मला खूप मोठा भावनिक आधार दिला.”

https://prahaar.in/2026/07/22/accused-traced-after-fourteen-months/

आगामी काळातील विद्यार्थ्यांसाठी मोलाचा सल्ला

भविष्यात परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना संदेश देताना NEET टॉपर आर्यन म्हणाला, “पुढील परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मी एवढेच सांगेन की, आपल्या शिक्षकांवर पूर्ण विश्वास ठेवा आणि त्यांचे मार्गदर्शन डोळे बंद करून स्वीकारा, कारण ते आपल्यापेक्षा खूप काही जाणतात. दररोज आपले बेस्ट द्या, शिस्त (Discipline) आणि सातत्य (Consistency) राखून सातत्याने मेहनत करत राहा; बाकी सर्व काही आपोआप मार्गी लागेल.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here