Home क्राईम Dehradun School Case: १५ वर्षीय विद्यार्थ्यावर अत्याचार केल्याप्रकरणी प्रिन्सिपल आणि व्यवस्थापक अटकेत

Dehradun School Case: १५ वर्षीय विद्यार्थ्यावर अत्याचार केल्याप्रकरणी प्रिन्सिपल आणि व्यवस्थापक अटकेत

0
Dehradun School Case: १५ वर्षीय विद्यार्थ्यावर अत्याचार केल्याप्रकरणी प्रिन्सिपल आणि व्यवस्थापक अटकेत

देहरादून: उत्तराखंडची राजधानी देहरादूनमधून एक अत्यंत संतापजनक आणि लाजीरवाणी घटना समोर आली आहे. येथील एका नामांकित शाळेच्या मुख्याध्यापकाने (प्रिन्सिपल) आणि व्यवस्थापकाने १५ वर्षीय विद्यार्थ्यावर अत्याचार केल्याची धक्कातदायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी मुख्याध्यापक आणि व्यवस्थापकाला अटक केली असून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

https://prahaar.in/2026/07/22/neet-protests-sonam-wangchuk-8-bollywood-films-rang-de-basanti-to-satyagrah-every-youngster-should-watch-today/

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित १५ वर्षीय मुलगा संबंधित खासगी शाळेत शिक्षण घेत होता. काही दिवसांपासून हा मुलगा अत्यंत शांत आणि एकांतात राहत होता. मुलाच्या या बदललेल्या आणि धास्तावलेल्या वर्तनामुळे त्रस्त होऊन पालकांनी त्याच्याकडे वारंवार विचारणा केली. त्यानंतर मुलाने आपल्यावर ओढवलेला आजी-माजी प्रकार पालकांना सांगितला, ज्यामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

काही दिवसांपूर्वी मुलगा आणि त्याचे आई-वडील मुख्याध्यापकाला भेटले होते. त्यावेळी मुख्याध्यापकाने पालकांचा विश्वास संपादन करून मुलाला आपल्या घरी ठेवण्यासाठी तयार केले. २८ जूनच्या रात्री जेवण आटोपून मुलगा झोपण्यासाठी जात असताना, मुख्याध्यापकाने त्याला थांबवून स्वतःसोबत एकाच बेडवर झोपवले आणि मध्यरात्री त्याच्यावर अत्याचार केला. या अमानुष कृत्यानंतर मुलगा तीव्र धक्क्यात असून तो कोणाशीही बोलण्याच्या मनस्थितीत नाही.

https://prahaar.in/2026/07/22/investigate-the-distribution-of-money-in-the-nashik-legislative-council-election/

पोलिसांची कडक कारवाई

मुलाच्या वडिलांनी या प्रकरणाबाबत प्रेमनगर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली. प्रकरणाचे गांभीर्य आणि संवेदनशीलता लक्षात घेऊन डेहराडूनच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षकांनी (SSP) तात्काळ कायदेशीर कारवाईचे आदेश दिले.

पोलिसांनी या प्रकरणी पोक्सो (POCSO) कायद्याच्या कलम ५(एफ), ६, ७ आणि ८ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले, तेथून त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. महिला आणि बाल अपराधांशी संबंधित प्रकरणांमध्ये कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here