Home ब्रेकिंग न्यूज BMC Building : महापालिका मुख्यालय इमारतीला वाळवी..

BMC Building : महापालिका मुख्यालय इमारतीला वाळवी..

0
BMC Building : महापालिका मुख्यालय इमारतीला वाळवी..
BMC Building

सचिन धानजी

मुंबई : मुंबई महापालिकेच्या (BMC) कारभारावर टीका होत असताना तसेच भविष्यातील आर्थिक संकटाबाबत चिंता व्यक्त केली जात असतानाच महापालिका मुख्यालयाच्या दरवाज्यांनाच वाळवी लागल्याचे प्रकार समोर येत आहे. सध्या वारंवार होत असलेले आरोप आणि टीका हे पाहता महापालिकेच्या कारभारालाच वाळवी लागल्याचे हे द्योतक असल्याचे मानले जात आहे.

https://prahaar.in/2026/07/22/bmc-live-broadcast-of-statutory-committee-meetings-too-following-the-corporation-meeting/

मुंबई महापालिका मुख्यालय विस्तारीत इमारतीच्या (Building) नुतनीकरणाबाबत महापालिकेच्यावतीने ३१ऑगस्ट २००९ला स्थायी समितीच्या ठरावानुसार शानदार इंटेरीअर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला विविध करांसह तसेच सल्लागार शुल्कासहित ८५. ३९ कोटी रुपयांचे कंत्राट दिले होते. हे कंत्राट ३६ महिन्यांकरता होते. त्यामुळे हे काम २०१२पर्यंत होते. परंतु २१ जून २०१२ला मंत्रालयात लागलेल्या आगीनंतर तत्कालिन आयुक्तांनी या विस्तारीत इमारतीच्या कामांमध्ये बदल केला. त्यामुळ २ लाख ०३ हजार २० चौरस फुटांच्या एकूण बांधकाम क्षेत्रापैंकी १ लाख १६ हजार चौरस फुटाचे काम नव्याने सुचवले आणि त्यामध्ये आग प्रतिबंधक उपाययोजनांच्या कामांचा समावेश केला. त्यानंतर एप्रिल २०१६ ला कंत्राटात फेरफार केलेल्या कामाच्या प्रस्तावाला मंजुरी देत त्यांना या कामांसाठी २ वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदत एप्रिल २०१९ ते १४ मार्च २०२१ रोजी ही मुदत संपुष्टात आल्यानंतर आणखी २ वर्षांचा कालावधी देण्यात आला. हा कालावधी आता १४ मार्च २०२३ ला संपुष्टात आला.

https://prahaar.in/2026/07/22/bmc-in-action-mode-municipal-corporation-takes-action-on-cleanliness/

मात्र या विस्तारित इमारतीच्या पोट मजल्यावर प्रवेशद्वार क्रमांक ७ ने प्रवेश केल्यानंतर पोट माळ्यावर प्रवेश करताना जो दरवाजा आहे त्यालाच वाळवी लागली आहे. या वाळवी दरवाजा पोखरून काढला असून पोखलेल्या वाळवीची माती खाली पडलेली आहे. मुंबई महापालिका मुख्यालयाच्या विस्तारित इमारतीचे तब्बल १४ वर्षे काम सुरू होते. आता मजल्याचे काम चार वर्षांपूर्वी पूर्ण झाले आहे. त्यामुळे पाच वर्षांच्या कालावधीत येथील लाकडांना वाळवी लागणे ही गंभीर बाब आहे. यामुळे कंत्राटदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

महापालिकेच्या मुख्यालय इमारतीच्या दुरुस्ती आणि नूतनीकरणावर तब्बल १२० खर्च

मुंबई महानगरपालिका मुख्यालय येथील मुख्य इमारतीच्या रंगीत काचांची पुनर्स्थापना करण्याचे काम ऑगस्ट २०१० मध्ये मंजूर करत मेसर्स ग्लास सेन्सेशन या कंत्राटदार कंपनीला ८२ लाख ५२ हजार ९०९ रुपयांत देण्यात आले. ऑक्टोबर २०११ रोजी मेसर्स शानदार इंटिरिअर प्रायव्हेट लिमिटेड या कंत्राटदारास ६८.७७ कोटी रुपयांस देण्यात आले. मुंबई महानगरपालिका मुख्यालय येथील विस्तारित इमारतीच्या नूतनीकरण कामाचा यात समावेश आहे. तर मुंबई महानगरपालिका मुख्यालय येथील विस्तारित इमारतीच्या नूतनीकरण कामावर ४३ कोटी ७०लाख ७१ हजार २१८ रुपयांचे कंत्रात मेसर्स स्कायवे इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंत्राटदारास जून २०१२ रोजीदेण्यात आले. या व्यतिरिक्त सल्लागार आणि आर्किटेक्टला दिलेल्या पैश्याचा अजून पर्यंत माहिती सार्वजनिक करण्यात आली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here