Home ब्रेकिंग न्यूज PM Narendra Modi : विद्यार्थ्यांबाबत सरकार संवेदनशील, नीट पेपर लीक प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींची कठोर भूमिका

PM Narendra Modi : विद्यार्थ्यांबाबत सरकार संवेदनशील, नीट पेपर लीक प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींची कठोर भूमिका

0
PM Narendra Modi : विद्यार्थ्यांबाबत सरकार संवेदनशील, नीट पेपर लीक प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींची कठोर भूमिका

नवी दिल्ली : नीट परीक्षा आणि पेपर लीक प्रकरणावरून विरोधकांच्या ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या संसद मार्चनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे या मुद्द्यावर पहिलेच वक्तव्य समोर आले आहे. एनडीए संसदीय पक्षाच्या बैठकीत बोलताना पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले की, सरकार देशातील युवकांच्या भविष्याशी अजिबात खेळ होऊ देणार नाही आणि पेपर लीकच्या दोषींना कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केले की, पेपर लीक हा राजकारणाचा विषय नसून तो देशाच्या तरुणांच्या भविष्याशी जोडलेला संवेदनशील विषय आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणूनच सरकारने तातडीने पावले उचलत पुनर्परीक्षा घेतली आणि ती यशस्वीपणे पूर्ण करून निकाल जाहीर करण्यात कोणताही विलंब केला नाही. केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी मंगळवारी पार पडलेल्या एनडीए संसदीय पक्षाच्या ‘मंगल मिलन’ बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पंतप्रधानांच्या या भूमिकेची माहिती दिली.

https://prahaar.in/2026/07/21/all-t20-rayudu-pathan-and-dilshan-to-shine-in-the-asian-legends-league-season-2-kicks-off-in-zambia-on-july-30/

पक्षीय राजकारणापलीकडील विषय

पेपर लीकची बातमी समोर येताच सरकारने क्षणाचाही विलंब न करता तात्काळ कारवाई केली आणि या प्रकरणात १३ जणांना अटक करून त्यांची तुरुंगात रवानगी केली. पेपर लीकच्या धंद्यात लिप्त असलेल्या आणि दोषी आढळलेल्यांना कठोर शासन मिळवून देण्यासाठी सर्वोच्च दर्जाच्या वकिलांनी सहकार्य करावे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे. जेणेकरून असे पापकृत्य करणाऱ्यांना कठोर शिक्षा होईल. हा विषय केवळ केंद्र सरकारचा किंवा एका राज्याचा नसून संपूर्ण देशाचा आहे. देशातील ज्या-ज्या राज्यांत अशा प्रकरणांमध्ये लोक गुंतले आहेत, त्यांना शिक्षा देण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. भविष्यात पुन्हा असा प्रकार घडू नये यासाठी अत्यंत कडक पावले उचलली जात असून, एक दोषरहित परीक्षा यंत्रणा तयार करण्यासाठी सर्वांनी मिळून काम केले पाहिजे, असे पंतप्रधान म्हणाले.

https://prahaar.in/2026/07/21/gold-seizures-nearly-doubled-following-the-hike-in-the-octroi-import-duty-government-informs-parliament/

धरणे आंदोलन संपवण्याचे आवाहन

या आंदोलनादरम्यान, ‘कॉकरोच जनता पार्टी’चे प्रतिनिधी सौरव दास आणि आशुतोष राकां यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. सूत्रांच्या माहितीनुसार, दोन्ही नेत्यांमध्ये दोन फेऱ्यांमध्ये चर्चा झाली. मंत्री जे. पी. नड्डा यांनी आंदोलकांना धरणे आंदोलन संपवून सामान्य स्थिती पूर्ववत करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. तसेच चर्चेदरम्यान नड्डा यांनी त्यांच्या मागण्या विचारल्या. यावर प्रतिनिधींनी आपल्या मागण्यांची यादी तोंडी सांगितली. त्यावर मंत्र्यांनी मागण्या लिखित स्वरूपात सादर करण्यास सांगितले. त्यानुसार ‘कॉकरोच’च्या प्रतिनिधींनी संध्याकाळी ४ वाजता केंद्रीय मंत्र्यांकडे आपल्या मागण्यांचे लिखित पत्र अधिकृतपणे सोपवले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here