मुंबई : फिफा विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात स्पेनने १-० ने अर्जेंटिनाचा पराभव केला होता. अंतिम सामन्यांनंतर अर्जेंटिनाला दुहेरी झटका लागला आहे. सामना संपल्यानंतर स्पेनच्या खेळाडूंशी झालेल्या वादानंतर फिफाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.काही खेळाडूंवर दंडही आकण्यात येऊ शकतो असं बोलले जात आहे. (Arg vs spa)
https://prahaar.in/2026/07/21/cabinet-decision-these-5-important-decisions-were-taken-at-the-state-cabinet-meeting/
नेमकं प्रकरण काय ?
स्पेनकडून १-० ने झालेल्या पराभवानंतर अंतिम शिट्टी वाजताच अर्जेंटिनाचा मिडफिल्डर लिएँद्रो पारेडेस याचा एरिक गार्सिया,गावीसोबत आणि काही खेळाडूंशी वाद झाला. हिंसक वर्तन केल्याप्रकरणी पारेदेसला रेड कार्डही देण्यात आलं होते. मात्र, या वादाचे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.या वादचा व्हिडिओ सोशल मिडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये शिट्टी वाजल्यानंतर एरिक मैदानावर पडल्याचं दिसतं आहे आणि त्यानंतर पारेडेसशी शाब्दिक वाद घालत होता.या वादादरम्यान पारेदेसने गार्सियाच्या मानेजवळ हात ठेवत त्याला जोरात ढकलल्याचंही प्रयत्न केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. (Argentina)
BREAKING: FIFA are set to investigate the behaviour of Argentina after the final whistle at the World Cup final. 🚨 pic.twitter.com/Z1soC4thpt
— Sky Sports News (@SkySportsNews) July 20, 2026
याचदरम्यान, अर्जेंटिनाचा बचावपटू नाहुएल मोलिना याने स्पेनचा कर्णधार रोद्रीला पाडण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्तही आले आहेत. इतकंच नव्हे, तर अर्जेंटिनाचे सहाय्यक प्रशिक्षक रोबर्टो आयासा यांनी डॉनी ओल्मो याच्या चेहऱ्यावर ठोसा मारण्याचा प्रयत्न केल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. या सर्व प्रकरणाची फिफाकडून दखल घेण्यात आली आहे.विजेतेपद हातातून निसटत असल्याचं लक्षात आल्यानंतर अर्जेंटिनाने अखेरच्या काही मिनिटांत आक्रमक खेळ करण्याचा निर्णय केला. मात्र, त्यापूर्वी खूप उशीर झाला होता. अंतिम शिट्टी वाजताच स्पेनच्या काही खेळाडूंनी विजयाच्या जल्लोषात मैदानात धाव घेतली . त्यावेळी दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये धक्काबुक्की आणि वाद झाला. (Spain)
🚨🥊 Full scenes after final whistle.@MickyJnr__ 🎥 pic.twitter.com/ZXCvAFkHwy
— Fabrizio Romano (@FabrizioRomano) July 20, 2026
https://prahaar.in/2026/07/21/sikkim-landslide-pm-modi-prime-minister-speaks-with-sikkim-chief-minister-regarding-the-samardung-tunnel-accident/
अर्जेंटिनाचे स्वप्नं अपूर्ण
संपूर्ण सामन्यात युरोपियन चॅम्पियन स्पेनने आपेल वर्चस्व राखलं. स्पेनने या सामन्यात अनेक संधी निर्माण केली. मात्र त्यांना ९० मिनिटांत एकही गोल करता आले नाही. अखेर अतिरिक्त वेळेच्या दुसऱ्या हाफमध्ये फेरान टोरेसने शानदार गोल करत स्पेनला आघाडी मिळवून दिली. अखेर स्पने हा सामना जिंकत दुसर्यांदा विश्वचषक जिंकले. १९६२ मध्ये ब्राझीलनंतर सलग दोन विश्वचषक जिंकणार पहिला संघ बनण्याची अर्जेंटिनाकडे संधी होती. (FIFA World Cup)