Home क्राईम Dhule News : लॉजमध्ये नको ते कृत्य ! तरुण-तरुणी रंगेहाथ ताब्यात, शहरात खळबळ

Dhule News : लॉजमध्ये नको ते कृत्य ! तरुण-तरुणी रंगेहाथ ताब्यात, शहरात खळबळ

0
Dhule News : लॉजमध्ये नको ते कृत्य ! तरुण-तरुणी रंगेहाथ ताब्यात, शहरात खळबळ
Mira-Bhainder crime

Dhule News : धुळे शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. शहरातील देवपूर परिसरात असलेल्या एका लॉजवर पोलिसांची मोठी कारवाई केल्याचं समोर आलं आहे. देवपूर भागातील जीटीपी स्टॉप येथील एका लॉजवर पोलिसांनी धाड टाकत तरुण तरुणींना ताब्यात घेतलंय. (Dhule Crime News)

https://prahaar.in/2026/07/20/share-market-black-monday-black-monday-deals-a-massive-blow-to-the-stock-market-sensex-plunges-by-700-points-markets-across-india-and-the-globe-in-turmoil/

नेमकं काय घडलं ?

धुळे शहरातील देवपूर परिसरात असलेल्या राधाकृष्ण लॉजवर पोलिसांनी कारवाई केल्याचं समोर आलं असून देवपूर भागातील जीटीपी स्टॉप येथील राधाकृष्ण लॉजवर देवपूर पोलिसांनी अचानक धाड टाकून कारवाई केली. या कारवाईदरम्यान लॉजमधून काही तरुण आणि तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक नगरसेवक ललित माळी यांनी या अवैध प्रकाराबाबत पोलिसांकडे तक्रार केली होती. आणि याच तक्रारींची गांभीर्याने दखल घेत देवपूर पोलीस ठाण्याच्या पथकाने ही धडक कारवाई केली. (Dhule Crime News)

https://prahaar.in/2026/07/20/an-opportunity-to-earn-a-whopping-%e2%82%b952000-for-spending-just-one-night-in-a-house-this-unusual-job-is-creating-quite-a-buzz/

देवपूर पोलिसांनी ताब्यात घेतलेली मुलं-मुली हे 20 वर्षावरील असल्याचं सांगून त्यांच्या पालकांना समज देऊन सोडून देणार असल्याचं पोलिसांनी यावेळी सांगितले. मात्र लॉजवर अशा प्रकारचे अवैध प्रकार सुरु असल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. (Dhule Crime News)

माहितीनुसार, देवपूर आणि आसपासच्या परिसरात बेकायदेशीर लॉजिंग व्यवसाय आणि संशयास्पद कॅफेचे जाळे वेगाने पसरत असून अनेक ठिकाणी गंभीर अवैध प्रकार सुरु असल्याचा आरोप आणि कुजबुज स्थानिक नागरिक करत आहे. या ठिकाणी होणाऱ्या अश्लील आणि बेकायदेशीर कृत्यांमुळे परिसरातील कौटुंबिक वातावरण दूषित होत असून शाळकरी आणि महाविद्यालयीन तरुणांवर याचा वाईट परिणाम होत असल्याची तीव्र भावना नगरसेवक ललित माळी यांनी व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here