टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या निवृत्तीबाबत सध्या क्रिकेट वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत. इंग्लंडविरुद्ध दमदार शतक झळकावल्यानंतर पुन्हा एकदा त्याच्या भविष्यावरून प्रश्न उपस्थित केले जात होते. या सर्व चर्चांना अखेर रोहित शर्माने बीसीसीआयच्या एका विशेष व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर उत्तर दिले आहे.
https://prahaar.in/2026/07/20/spains-historic-victory-and-the-dawn-of-a-new-era/
काय म्हणाला रोहित शर्मा?
रोहितने स्पष्ट केले की, तो सध्या कोणतीही निवृत्ती घेत नसून तो एकदिवसीय (ODI) क्रिकेट खेळतच राहणार आहे. आपल्या भूमिकेबद्दल बोलताना तो म्हणाला:
“माझं काम फक्त बॅटिंग करणं, मैदानात उतरणं आणि देशाचं प्रतिनिधित्व करणं हेच आहे. मी जेव्हापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले, तेव्हापासूनच अशा चर्चा किंवा टीका सुरू आहेत. जोपर्यंत मी खेळत आहे, तोपर्यंत या चर्चा थांबणार नाहीत, पण त्यामुळे मला काहीही फरक पडत नाही.”
He was the most-talked about cricketer before the Lord’s ODI and he still remains the most-talked about after his scintillating hundred 🙌
🎥 Hear from the man himself as he soaked everything in to produce a masterclass 🫡 – By @RajalArora #TeamIndia | @ImRo45…
— BCCI (@BCCI) July 20, 2026
‘चर्चा झाली नाही तर मजा नाही!’
टीकाकारांना मजेशीर अंदाजात प्रत्युत्तर देताना रोहित म्हणाला की, अशा चर्चा सुरू राहिल्या पाहिजेत, कारण त्याशिवाय खेळात काहीच मजा उरत नाही. त्याचे लक्ष केवळ मैदानावर जाऊन संघासाठी जास्तीत जास्त योगदान देण्यावरच केंद्रित असल्याचे त्याने नमूद केले.
https://prahaar.in/2026/07/20/talk-of-rohits-retirement-is-captain-gill-finally-breaks-silence-on-rumors-regarding-rohits-retirement-offers-a-major-clarification/
विराट कोहलीसोबतच्या मैत्रीवर भाष्य
या मुलाखतीत रोहितने सहकारी खेळाडू विराट कोहलीसोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. संपूर्ण कारकिर्दीत एकत्र खेळल्यामुळे मैदानात विराटसोबत फलंदाजी करणे नेहमीच आनंददायी आणि सोपे असल्याचे त्याने सांगितले. दोघेही एकमेकांना उत्तम प्रकारे ओळखत असल्यामुळे मैदानावरील भागीदारी नेहमीच खास ठरल्याचे त्याने आवर्जून सांगितले.