Home क्रीडा Virat-Rohit Record : रोहित आणि विराटने रचला इतिहास ! अशी कामगिरी करणारी भारताची पहिली जोडी

Virat-Rohit Record : रोहित आणि विराटने रचला इतिहास ! अशी कामगिरी करणारी भारताची पहिली जोडी

0
Virat-Rohit Record : रोहित आणि विराटने रचला इतिहास ! अशी कामगिरी करणारी भारताची पहिली जोडी

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना सध्या लंडनच्या लॉर्ड्सवर सुरू आहे. या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. रोहित आणि विराट ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४०० सामने खेळणारी पहिली भारतीय जोडी ठरली आहे. त्यांनी एकत्र ३९९ आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांचा आधीचा विक्रम मोडला आहे. (Virat-Rohit Record)

 

View this post on Instagram

 

A post shared by Team India (@indiancricketteam)

सर्वाधिक सामने खेळण्याचा रेकॉर्ड कुठल्या जोडीचा

जागतिक स्तरावर सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने एकत्र खेळण्याचा विक्रम श्रीलंकाच्या कुमार संगकारा आणि महेला जयवर्धने यांच्या नावावर आहे. या जोडीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५५० सामने खेळले आहेत. त्यानंतर तिलकरत्ने दिलशान आणि महेला जयवर्धने यांचा नंबर आहे. या जोडीने सोबत ४२६ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. रोहित आणि विराटने या ऐतिहासिक यादीत आपल्या नावाची नोंद केली आहे. रोहित आणि विराटची (Virat Kholi) जोडी सध्या या यादीत सहाव्या स्थानावर आहे. (Ind vs Eng)

१. कुमार संगकारा आणि माहेला जयवर्धने (श्रीलंका): ५५० सामने

२. तिलकरत्ने दिलशान आणि माहेला जयवर्धने (श्रीलंका): ४२६ सामने

३. कुमार संगकारा आणि तिलकरत्ने दिलशान (श्रीलंका): ४१८ सामने

४. सनथ जयसूर्या आणि मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका): ४०८ सामने

५. जॅक कॅलिस आणि मार्क बाउचर (दक्षिण आफ्रिका): ४०७ सामने

६. रोहित शर्मा आणि विराट कोहली (भारत): ४०० सामने (खेळत आहे)

७. सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड (भारत): ३९१ सामने

८. मुथय्या मुरलीधरन आणि माहेला जयवर्धने (श्रीलंका): ३८३ सामने

९. कुमार संगकारा आणि मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका): ३७८ सामने

१०. एमएस धोनी आणि सुरेश रैना (भारत) / राहुल द्रविड आणि सौरव गांगुली (भारत): ३६९ सामने

१८ वर्षापासून एकत्र खेळत आहेत

रोहितने २००६ मध्ये, तर विराटने २००८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. गेल्या १८ वर्षापासून या जोडीने अनेक जागतिक विक्रम मोडीत काढले आहेत. या दोघांही एकत्र खेळत भारतासाठी दोन टी-२० विश्वचषक आणि दोन चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत जेतेपद पटकावले आहे. (Rohit Sharma)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here