मुंबई(Mumbai) : बॉलीवूडचा भाई जान म्हणजेच सलमान खान हा त्याच्या फीट बॉडीमुळे नेहमी चर्चेत असायचा. मात्र सध्या सोशल मीडिया वर सलमान खानचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. चाहत्यांना त्याचा लेटेस्ट व्हिडिओ पाहून धक्का बसला आहे, सलमानचा व्हिडिओ पाहून चाहते टेन्शनमध्ये आले आहेत.(Salman Khan)
View this post on Instagram
सलमान खान नुकताच Slum Rehabilitation Authority च्या कार्यालयात गेला होता. येथे त्याने प्राधिकरणाच्या डेटा संकलन आणि पडताळणी सहाय्यता केंद्राचे (आयटी सर्व्हर रूम) उद्घाटन केले. यादरम्यान सलमान खानने डेनिम आणि क्रिम रंगाचं शर्ट घातलं आहे. त्याने हिरव्या रंगाची टोपीही घातली आहे. सलमान खान आधीपेक्षा बारीक दिसत आहे. त्याचं वजनदेखील कमी झालं आहे. याशिवाय तो खोकतानाही दिसत आहे. त्यामुळे सलमान खानला कोणता आजार झालाय की काय असा सवाल उपस्थित केला जात आहे.
सलमान खान लवकरच मातृभूमी चित्रपटात दिसेल. मात्र हा चित्रपट पुढे ढकलला आहे. चित्रपटाचा टीचर रिलिज झाला आहे. चित्रपटातील अनेक गाणीही रिलिज झाली आहेत. मात्र चित्रपट कधी प्रदर्शित होईल याबाबत कोणतीही बातमी समोर आलेली नाही. याशिवाय सलमान खान हा नयनतारा असलेल्या ‘SVC63’ या चित्रपटात दिसणार आहे.