Home ताज्या घडामोडी Skirt Fashion: स्टायलिश दिसायचंय? मग हे ट्रेंडी स्कर्ट नक्की ट्राय करा

Skirt Fashion: स्टायलिश दिसायचंय? मग हे ट्रेंडी स्कर्ट नक्की ट्राय करा

0
Skirt Fashion: स्टायलिश दिसायचंय? मग हे ट्रेंडी स्कर्ट नक्की ट्राय करा

स्टायलिश दिसण्यासाठी आपण नेहमी जीन्स किंवा वन-पीस परिधान करतो. मात्र, या नेहमीच्या फॅशनला थोडा वेगळा ट्विस्ट द्यायचा असेल, तर कधीतरी स्कर्ट हा देखील उत्तम पर्याय ठरू शकतो. योग्य स्टाइल आणि मॅचिंगसह परिधान केलेला स्कर्ट तुम्हाला आकर्षक, ट्रेंडी आणि परफेक्ट लूक देऊ शकतो. (Skirt Fashion)

पेन्सिल स्कर्ट


ऑफिस, मिटिंग किंवा फॉर्मल लूकसाठी पेन्सिल स्कर्ट हा सर्वोत्तम पर्याय आहे. प्लेन ब्लाऊज किंवा शर्टसोबत तो खूप एलिगंट दिसतो.

https://prahaar.in/2026/07/19/plot-to-murder-husband-for-%e2%82%b920-lakh-insurance-case-registered-against-four-including-the-wife-shocking-claim-emerges-during-investigation/

 लाँग स्कर्ट


आरामदायी आणि स्टायलिश लूकसाठी लाँग स्कर्ट उत्तम ठरतो. स्ट्रेट, प्लिटेड, टी-लेंथ आणि फुल-लेंथ अशा अनेक डिझाइन्स उपलब्ध आहेत.

 ए-लाइन स्कर्ट


सध्या ए-लाइन स्कर्टची फॅशन ट्रेंडमध्ये आहे. हा स्कर्ट जवळपास प्रत्येक बॉडी टाइपवर आकर्षक दिसतो.

https://prahaar.in/2026/07/19/all-party-meeting-ahead-of-the-monsoon-session-tmc-furious-over-the-participation-of-rebel-mps/

 डेनिम स्कर्ट


कॅज्युअल आणि ट्रेंडी लूकसाठी डेनिम स्कर्ट बेस्ट आहे. प्लेन बटन-डाउन शर्ट आणि स्किनी बेल्टसोबत हा लूक अधिक उठून दिसतो.

हाय-वेस्ट स्कर्ट


हाय-वेस्ट स्कर्टसोबत हायनेक क्रॉप टॉप आणि हाय हिल्सची जोडी परफेक्ट फॅशन तयार करते.

प्लेटेड स्कर्ट


प्लेटेड डिझाइनमुळे स्कर्टला वेगळा फ्लो आणि आकर्षक लूक मिळतो. पार्टी किंवा कॅज्युअल आउटिंगसाठी हा उत्तम पर्याय आहे.

फ्लोरल प्रिंट स्कर्ट


रंगीबेरंगी फ्लोरल प्रिंट असलेले स्कर्ट उन्हाळ्यासाठी अगदी योग्य आहेत. हे स्कर्ट फ्रेश आणि स्टायलिश लूक देतात.