Home ब्रेकिंग न्यूज Coastal Road Accident : मुंबई कोस्टल रोडवर भरधाव पोर्शेचा भीषण अपघात; एअरबॅगमुळे वाचले दोघांचे प्राण

Coastal Road Accident : मुंबई कोस्टल रोडवर भरधाव पोर्शेचा भीषण अपघात; एअरबॅगमुळे वाचले दोघांचे प्राण

0
Coastal Road Accident : मुंबई कोस्टल रोडवर भरधाव पोर्शेचा भीषण अपघात; एअरबॅगमुळे वाचले दोघांचे प्राण
road acciadent

मुंबई(Mumbai) : मुंबईतील कोस्टल रोडवर रविवारी सकाळी सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास एका आलिशान पोर्शे कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात महागड्या पोर्शे कारच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. मात्र, कारमधील एअरबॅग वेळेवर उघडल्याने चालकासह प्रवाशाचे प्राण वाचले. सुदैवाने या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.(Road Accident)

 

View this post on Instagram

 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

https://prahaar.in/2026/07/19/pv-sindhu-created-history-by-defeating-her-opponent-in-the-final-match/

प्राथमिक माहितीनुसार, ही पोर्शे कार कोस्टल रोडवर अतिवेगाने धावत होती. याच वेळी चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट रस्त्याच्या दुभाजकाला जाऊन धडकली. धडक इतकी जोरदार होती की आलिशान स्पोर्ट्स कारच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने असलेल्या एअरबॅग यंत्रणेने योग्य वेळी काम केल्याने कारमधील दोन्ही प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

https://prahaar.in/2026/07/19/ind-vs-eng-what-time-does-the-third-odi-between-india-and-england-start-what-will-the-lords-pitch-be-like/

अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. अवघ्या आठ मिनिटांत बचावकार्य सुरू करण्यात आले आणि कारमधील दोन्ही व्यक्तींना सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यानंतर अपघातग्रस्त कार रस्त्यावरून बाजूला हटवण्यात आली. काही काळासाठी कोस्टल रोडवरील वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र पोलिसांनी तातडीने कारवाई करत वाहतूक सुरळीत केली.(Mumbai)

https://prahaar.in/2026/07/19/new-us-rules-for-f-1-and-j-1-visa-holders-concerns-rise-among-indian-students/

टॅप टर्बो इंजिनिअर्स प्रायव्हेट लिमिटेडचे फिल्ड इंचार्ज रवी गुप्ता यांनी सांगितले की, कोस्टल रोडवर विशेषतः शनिवार-रविवारी अनेक वाहनचालक अतिवेगाने आणि निष्काळजीपणे वाहन चालवतात. पावसामुळे रस्ता ओला असल्याने वाहनावरील नियंत्रण सुटण्याची शक्यता वाढते. दरम्यान, या अपघातामागे अतिवेग कारणीभूत आहे की वाहनातील कोणता तांत्रिक बिघाड झाला होता, याचा तपास मुंबई पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here