लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा आणि निर्णायक सामना शनिवार १९ जुलै रोजी लंडन येथील लॉर्ड्स मैदानावर खेळवला जाणार आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने सहा विकेट्सने विजय मिळवला होता. मात्र कार्डिफ येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात चार विकेट्सने विजय मिळवत इंग्लंडने मालिकेत दमदार पुनरागमन केल. त्यांनी मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. यामुळे होम ऑफ क्रिकेट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्स येथे होणार सामना निर्णायक ठरणार आहे. कार्डिफ येथे झालेला सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ५:३० वाजता सुरू झाला होता. मात्र तिसऱ्या सामन्याच्या वेळेत बदल झाले आहे. मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३:३० वाजता सुरू होणार आहे. (Ind vs Eng )
कार्डिफ येथे झालेल्या सामन्यात भारताचा पराभव झाला, मात्र भारतासाठी विराट कोहलीने पुन्हा एकदा फॉर्ममध्ये येणे ही अत्यंत आनंदाची बाब आहे. विराटने कार्डिफ येथे झालेल्या सामन्यात उत्कृष्ट फलंदाजी करत ६५ धावांची खेळी केली होती. मात्र, रोहित शर्माची फॉर्म अद्याप भारतासाठी चिंतेचा विषय आहे. रोहितने या वर्षी एकूण आठ एकदिवसीय सामन्यात फक्त एक अर्धशतक झळकावला आहे. लॉर्ड्स येथे होणार असलेल्या सामन्यात त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.केएल राहुलने २०२५ पासून भारतासाठी सर्वात चांगल्या सरासरीने धावा केल्या आहेत. त्याने ६८ च्या सरासरीने १५ डावात ५४८ धावा केल्या आहेत. दरम्यान , वॉशिंग्टनला दुखापतीमुळे निर्णायक सामन्यात भाग घेता येणार नाही. यामुळे संघाला त्याच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करावे लागणार आहेत. (Rohit Sharma)
२२ वर्षापासून एकही सामाना जिंकता आला नाही
लॉईसने भारतासाठी अनेक अविस्मरणीय क्षण अनुभवले असले, तरी २००४ पासून भारतीय संघाने तिथे एकही एकदिवसीय सामना जिंकलेला नाही. हा दुष्काळ संपवून मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी भारतीय संघाकडे आहे.दुसरीकडे, कार्डिफमध्ये ९९ धावांची नाबाद खेळी करत जो रूटने पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली. त्याच्या कामगिरीमुळे इंग्लंडचा आत्मविश्वास उंचावला असून, त्याने सलग पाच एकदिवसीय सामन्यांमध्ये अर्धशतके झळकावली आहेत. भारतीय गोलंदाजांसमोर रूटला रोखण्याचे मोठे आव्हान असेल. कारण दुसऱ्या सामन्यात जसप्रीत बुमराहविरुद्ध त्याने अत्यंत संयमाने फलंदाजी केली होती. (Virat Kholi )
https://prahaar.in/2026/07/19/plot-to-murder-husband-for-%e2%82%b920-lakh-insurance-case-registered-against-four-including-the-wife-shocking-claim-emerges-during-investigation/
पिच रिपोर्ट
लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी उपयुक्त मानली जाते. मात्र, सुरुवातीचे आव्हान पार केल्यास फलंदाजी सोपी होत जाते. या मैदानावर लक्ष्याचा पाठलाग करणे सोपे असते. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.लॉर्ड्सवर आतापर्यंत ७१ एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. यापैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ३५ आणि पाठलाग करणाऱ्या संघाने ३३ सामने जिंकले आहेत. तर, २ सामने बरोबरीत सुटले आणि एक सामन्याचा निकाल लागला नाही. (Lords Cricket )
https://prahaar.in/2026/07/19/fifa-world-cup-2026-mbappes-historic-performance-leaves-messi-behind-in-the-race-for-the-golden-boot/
हवामानाचे अपडेट
लंडनमध्ये रविवारी हवामान स्वच्छ राहील. कमाल तापमान २४ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १४ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. पावसाची शक्यता नाही. त्यामुळे एक चांगला सामना पाहायला मिळू शकतो.
https://prahaar.in/2026/07/18/merger-of-6-mps-into-shiv-sena-approved-lok-sabha-speakers-decision-major-setback-for-the-ubt-faction/
संभाव्य प्लेइंग-११
भारत: रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, केएल राहुल/ईशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, गुरनूर बरार, प्रसिद्ध कृष्णा.
इंग्लंड: बेन डकेट, जेकब बेथेल, जो रूट, हॅरी ब्रूक (कर्णधार), जोस बटलर (यष्टीरक्षक), सॅम करन, विल जॅक्स, गस ॲटकिन्सन, जोफ्रा आर्चर, साकिब महमूद, आदिल रशीद.