वसई : वसई पूर्वेतील मेधे ग्रामपंचायत हद्दीतील वडघर गावाकडे जाणारा पूल शनिवारी दुपारी अचानक कोसळल्याने परिसरात खळबळ उडाली. या दुर्घटनेत पुलावरून जात असलेली दोन वाहने खाली कोसळली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, वाहनांचे मोठे नुकसान झाले असून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. (Vasai news)
मिळालेल्या माहितीनुसार, हा पूल वडघर, काळभोन, लेंडी आणि आसपासच्या गावांना जोडणारा प्रमुख मार्ग होता. पूल कोसळल्यानंतर या गावांचा थेट संपर्क तुटला असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. (Vadghar Bridge)
https://prahaar.in/2026/07/19/24-year-old-worker-dies-of-electric-shock-while-installing-a-hoarding-in-ambernath/
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, जवळील गौण खनिज खाणींमधून मोठ्या प्रमाणात अवजड वाहने या पुलावरून नियमितपणे ये-जा करत होती. पुलाच्या क्षमतेपेक्षा अधिक वजनाची वाहतूक होत असल्याची तक्रार अनेक वेळा प्रशासनाकडे करण्यात आली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे अखेर पूल कोसळल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. (Bridge Collapse)
दुर्घटनेनंतर वडघर, काळभोन आणि लेंडी या भागातील नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे. सध्या या गावांमध्ये पोहोचण्यासाठी गणेशपुरीमार्गे सुमारे 20 किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास करावा लागत असल्याने दैनंदिन जीवनावर परिणाम झाला आहे.
View this post on Instagram
घटनेची माहिती मिळताच संबंधित प्रशासन आणि स्थानिक अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पुलाच्या कोसळण्यामागील कारणांचा तपास सुरू असून परिसर सुरक्षित करण्यात आला आहे. (Vasai)
https://prahaar.in/2026/07/18/aadhaar-app-crosses-the-4-crore-download-milestone/
दरम्यान, स्थानिक नागरिकांनी तातडीने पर्यायी रस्ता उपलब्ध करून द्यावा तसेच नवीन पूल उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करावे, अशी मागणी केली आहे. या घटनेमुळे परिसरातील पायाभूत सुविधांच्या सुरक्षिततेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. (Maharashtra News)