Home महाराष्ट्र ठाणे Ambernath News : अंबरनाथमध्ये होर्डिंग लावताना विजेचा धक्का; 24 वर्षीय कामगाराचा मृत्यू

Ambernath News : अंबरनाथमध्ये होर्डिंग लावताना विजेचा धक्का; 24 वर्षीय कामगाराचा मृत्यू

0
Ambernath News : अंबरनाथमध्ये होर्डिंग लावताना विजेचा धक्का; 24 वर्षीय कामगाराचा मृत्यू

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपरिषदेच्या हद्दीत होर्डिंग उभारण्याचे काम सुरू असताना झालेल्या अपघातात 24 वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला. या घटनेमुळे कामगारांच्या सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. (Ambernath News)

मृत कामगाराची ओळख इंद्रेश राजभर (वय 24) अशी झाली आहे. तो ठाण्यातील बाळकुम परिसरातील रहिवासी होता. प्राथमिक माहितीनुसार, अंबरनाथमध्ये लोखंडी होर्डिंग बसवण्याचे (Hoarding Accident) काम सुरू असताना इंद्रेश लोखंडी सळई हलवत होता. त्यावेळी सळईचा संपर्क जवळून गेलेल्या उच्चदाबाच्या वीजवाहिनीशी आला. त्यामुळे त्याला जोरदार विजेचा धक्का बसला आणि तो घटनास्थळीच गंभीर जखमी झाला.

सहकाऱ्यांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अपघात नेमका कसा झाला आणि सुरक्षेच्या नियमांचे पालन झाले होते का, याचा तपास सुरू आहे. ( Electric Shock)

https://prahaar.in/2026/07/19/kalyans-pendya-bhai-murder-case-solved-within-36-hours-three-arrested-one-accused-absconding/

घटनास्थळी कामगारांसाठी आवश्यक सुरक्षा साधने उपलब्ध नव्हती, असा आरोप करण्यात येत आहे. कामगारांना सेफ्टी बेल्ट, हेल्मेट किंवा इतर संरक्षक साहित्य न देता काम सुरू असल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित ठेकेदार आणि जबाबदार व्यक्तींवर कारवाईची मागणी होत आहे.

https://prahaar.in/2026/07/18/pune-sambajinagar-journey-in-two-hours-mumbai-bengaluru-distance-in-five-hours/

या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस अधिक तपास करत असून, तपासानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. (Thane News)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here