Home टेक्नॉलॉजी Websites : सरकारी कागदपत्रे घरबसल्या काढण्यासाठी ‘या’ आहेत अधिकृत वेबसाईट्स!

Websites : सरकारी कागदपत्रे घरबसल्या काढण्यासाठी ‘या’ आहेत अधिकृत वेबसाईट्स!

0
Websites : सरकारी कागदपत्रे घरबसल्या काढण्यासाठी ‘या’ आहेत अधिकृत वेबसाईट्स!
websites

तुमचे पैसे वाचवणाऱ्या या ५ सरकारी वेबसाईट्स लगेच सेव्ह करा!

मुंबई (Mumbai ): तुम्हाला माहितीये का? सरकारी कागदपत्रे काढायची किंवा त्यात काही बदल करायचा म्हटलं की आपण अनेकदा एजंटकडे किंवा सायबर कॅफेमध्ये धाव घेतो आणि जास्तीचे पैसे मोजतो. पण आज मी तुम्हाला अशा काही ५ अधिकृत सरकारी वेबसाईट्स सांगणार आहे, ज्यांचा वापर करून तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून ही सगळी कामं मोफत किंवा अगदी कमी पैशात करू शकता! ही माहिती खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे हा व्हिडिओ आताच ‘सेव्ह’ करा(Websites)

 

View this post on Instagram

 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

https://prahaar.in/2026/07/18/exactly-how-much-fee-does-the-government-charge-for-these-10-government-documents/

सर्वांत आधी, आपलं आधार कार्ड. आधार डाऊनलोड करायचंय किंवा पत्ता अपडेट करायचा असेल, तर भारत सरकारची अधिकृत वेबसाईट आहे – uidai.gov.in. दुसरं म्हणजे बँक आणि आर्थिक व्यवहारांसाठी अत्यंत महत्त्वाचं असलेलं पॅन कार्ड. नवीन पॅन कार्ड काढण्यासाठी किंवा जुन्या कार्डमध्ये बदल करण्यासाठी onlineservices.proteantech.in या वेबसाईटला नक्की भेट द्या.”जर तुम्ही परदेशात जाण्याचं स्वप्न पाहत असाल, तर पासपोर्ट तर लागणारच. यासाठी एजंटला पैसे न देता थेट passportindia.gov.in वरून अप्लाय करा. आता गाडी चालवायची म्हटल्यावर लायसन्स हवं. तुमचं नवीन ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी किंवा रिन्यू करण्यासाठी parivahan.gov.in या पोर्टलचा वापर करा.

https://prahaar.in/2026/07/18/dhule-accident-nashik-family-meets-with-horrific-accident-in-dhule/

इथे तुम्ही आरटीओची अनेक कामे ऑनलाईन करू शकता. आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान ओळखपत्र अत्यंत आवश्यक आहे. नवीन वोटर आयडी काढण्यासाठी voters.eci.gov.in ही अधिकृत वेबसाईट आहे.
याव्यतिरिक्त, सर्वांत महत्त्वाचं म्हणजे ५ लाखांपर्यंत मोफत उपचारांची सुविधा देणारं आयुष्मान कार्ड! हे कार्ड ऑनलाईन काढण्यासाठी beneficiary.nha.gov.in या वेबसाईटचा वापर करा.”आणि हो, एक बोनस माहिती! या सर्व कागदपत्रांव्यतिरिक्त इतर अनेक सरकारी योजना, नोकऱ्या आणि शिक्षणाशी संबंधित अचूक माहिती एकाच ठिकाणी हवी असेल, तर publicseva.in ला नक्की भेट द्या. आहे ना ही अत्यंत उपयुक्त आणि पैशांची बचत करणारी माहिती? मग ही रील तुमच्या मित्र-मैत्रिणी आणि सर्व नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी प्रहारन्यूजलाईनला लगेच फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here