Home महाराष्ट्र नाशिक Nashik Crime News : आधी हत्या मग आत्महत्या ; तरुणीची हत्या करणाऱ्या तरुणानेही जीवन संपवलं; रात्री नेमकं काय घडलं ?

Nashik Crime News : आधी हत्या मग आत्महत्या ; तरुणीची हत्या करणाऱ्या तरुणानेही जीवन संपवलं; रात्री नेमकं काय घडलं ?

0
Nashik Crime News : आधी हत्या मग आत्महत्या ; तरुणीची हत्या करणाऱ्या तरुणानेही जीवन संपवलं; रात्री नेमकं काय घडलं ?
Sangli Crime

Nashik Crime News : नाशिकच्या इंदिरानगर परिसरात घडलेल्या एका घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. नाशिकच्या इंदिरानगर परिसरात शुक्रवारी एका तरुण मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली. वैष्णवी अनिल आवारे असं हत्या करण्यात आलेल्या मृत तरुणीचं नाव असून शहरात घडलेल्या या घटनेनं एकीकडे संताप व्यक्त आहे. दरम्यान या प्रकरणात आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.

शुक्रवारी रात्री धारदार शस्त्राने तरुणीची हत्या करण्यात आल्यानंतर, आज शनिवारी पहाटेच्या सुमारास संशयित आरोपी तरुणाचाही मृतदेह पोलिसांना आढळून आला आहे. प्राथमिक माहितीनुसार, एकतर्फी प्रेमातून हत्या केल्यानंतर संशयित साहिल अशोक लाव्हारे यानेही इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकमध्ये एका झाडावर गळफास घेत आत्महत्या करून जीवन संपविण्याची घटना घडली आहे. या या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

https://prahaar.in/2026/07/18/nashik-crime-news-life-threatening-attack-on-family-over-a-trivial-issue/

शुक्रवारी रात्री काय घडलं ?

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत तरुणी वैष्णवी अनिल आवारे मूळची अमळनेर येथील रहिवासी होती. ती नाशिकमधील इंदिरानगर परिसरातील कानडे रो-हाऊस येथे पेईंग गेस्ट (PG) म्हणून राहून आपले शिक्षण पूर्ण करत होती. शुक्रवारी रात्री वैष्णवी तिच्या मैत्रिणीसोबत वनसंपदा सोसायटीच्या उद्यानात बसलेली असताना, संशयित तरुण तिथे आला. त्याने वैष्णवीशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने त्याला बोलण्यास टाळाटाळ केली. या गोष्टीचा राग अनावर झाल्याने संशयिताने अचानक खिशातून चाकू काढत वैष्णवीच्या गळ्यावर सपासप वार केले. गंभीर जखमी झालेली वैष्णवी रक्ताच्या थारोळ्यात जागीच कोसळली.

दत्त मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ अचानक झालेल्या आरडाओरडीमुळे परिसरातील नागरिक घराबाहेर आले. रक्तबंबाळ अवस्थेतील तरुणीला पाहून त्यांनी तत्काळ इंदिरानगर पोलिसांना याबाबत माहिती दिली. घटनास्थळावरून पोलिसांनी हत्येसाठी वापरलेला चाकू जप्त केला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून गुन्हे शाखा आणि फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळाची पाहणी केली. पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. या प्रकरणी गोपाल धरमदास बैरागी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

https://prahaar.in/2026/07/18/nashik-simhastha-kumbhmela-approval-granted-to-allocate-funds-worth-%e2%82%b91200-crore-for-the-simhastha-kumbh-mela/

आधी हत्या मग आत्महत्या

वैष्णवीची हत्या केल्यानंतर पसार झालेल्या संशयित साहिल अशोक लाव्हारेनेही टोकाचे पाऊल उचलले. त्याने आज (शनिवारी) पहाटे तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास इंदिरानगर येथील जॉगिंग ट्रॅक परिसरात एका झाडाला लटकून गळफास घेत आत्महत्या केली, अशी माहिती पोलीस दिली आहे. एकाच रात्री घडलेल्या या हत्या आणि आत्महत्येच्या सत्रामुळे इंदिरानगर भागात दहशतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान या दोन्ही घटनांचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here