Home ब्रेकिंग न्यूज Chemical Tanker Explosion : चेंबूरमध्ये केमिकल टँकरचा भीषण स्फोट, एकाचा मृत्यू तर तीन जण जखमी

Chemical Tanker Explosion : चेंबूरमध्ये केमिकल टँकरचा भीषण स्फोट, एकाचा मृत्यू तर तीन जण जखमी

0
Chemical Tanker Explosion : चेंबूरमध्ये केमिकल टँकरचा भीषण स्फोट, एकाचा मृत्यू तर तीन जण जखमी

दुरुस्तीचे काम सुरु असताना अचानक केमिकल टँकर फुटला, दुर्घटनेत एकाचा मृत्यू

मुंबई : चेंबूर (Chembur) पूर्व येथील मुकुंद नगर परिसरात केमिकल टँकरवर देखभालीचे काम सुरू असताना झालेल्या स्फोटात एकाचा मृत्यू झाला असून तिघेजण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली. (Mumbai News)

https://prahaar.in/2026/07/17/whose-severed-foot-is-this-human-foot-fragment-found-on-the-amritsar-express-at-csmt-station/

प्राथमिक माहितीनुसार, ही घटना मुकुंद नगर, म्हाडा वसाहत, म्हैसूर कॉलनीजवळ घडली. केमिकल टँकरवर देखभाल आणि दुरुस्तीचे काम सुरू असताना अचानक स्फोट झाला. स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस, 108 रुग्णवाहिका सेवा, बेस्ट आणि महानगरपालिकेचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. (Chembur News)

या दुर्घटनेत चार जण जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यापैकी एका जखमीचा लोकमान्य टिळक महानगरपालिका (सायन) रुग्णालयात उपचारादरम्यान ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. उर्वरित तिघांवर उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. (Chmebur Tanker Explosion)

https://prahaar.in/2026/07/17/replica-of-siddhivinayak-temple-to-be-built-in-manipur/

या घटनेत मोहम्मद अक्रम (१९) आणि मोहम्मद फैयाझ हे गंभीर जखमी झाले होते. यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. स्फोटाचे नेमके कारण काय होते, याचा तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू असून अधिक माहितीची प्रतीक्षा आहे. (Accident News)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here