Nashik : यंदा पाऊस कमी होणार असल्याच्या चर्चामुळे आणि नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे नाशिक शहरात जून आणि जुलै महिन्यात तसेच आगस्टमध्ये दर दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय नाशिक महापालिकेने घेतला होता. मात्र आता गंगापूर धरणातील (Gangapur Dam) पाणीसाठा वाढल्याने उद्या शनिवारी पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे.
https://prahaar.in/2026/07/17/vande-mataram-insult-bill-three-year-jail-proposed-by-central-government/
नाशिक महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा महापौर हिमगौरी आहेर-आडके (Mayor Himgauri Aher-Adke) त्यांच्या अध्यक्षतेखाली आज शुक्रवारी पार पडली. ही सभा सुरू असताना सभासदांनी शहरामध्ये दर शनिवारची सुरू असलेली पाणी कपात रद्द करण्याची मागणी केली. या मागणी वरती सभेमध्ये चर्चा करताना नगरसेवक गुरमित बग्गा, दिनकर पाटील, अजय बोरस्ते, हेमलता पाटील, राहुल दिवे आणि अन्य सदस्यांनी धरणाची एकूणच परिस्थिती बघता पाणी पातळी वाढलेली आहे, त्यामुळे पाणी कपात रद्द करण्यात यावी अशी मागणी केली.
https://prahaar.in/2026/07/17/dedicated-deputy-collector-for-simhastha-kumbh-mela/
या मागणी वरती प्रशासनाच्या वतीने माहिती देताना सांगण्यात आले की सध्याच्या परिस्थितीमध्ये गंगापूर धरण हे 71 टक्के भरले आहे. त्यामुळे शासनाच्या आदेशानुसार अजून काही दिवस तरी धरण भरून द्यावे लागेल मात्र धरणातील पाणीसाठा ७१ टक्के असल्याचे लक्षात घेता महापौर हिमगौरी आहेर-आडके (Mayor Himgauri Aher-Adke) यांनी शनिवारी बंद ठेवण्यात येत असलेला पाणी पुरवठा दि. १८/०७/२०२६ पासुन नियमित सुरु ठेवणेबाबतचे निर्देश दिलेले आहे. त्यानुसार संपुर्ण नाशिक शहराचा शनिवारचा पाणी पुरवठा पुर्ववत सुरळीत सुरु राहणार आहे.