मुर्शिदाबाद : पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद (Murshidabad) जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी भीषण रेल्वे अपघात (Train Accident) झाला. बरहमपूर (Berhampore) परिसरात प्रवासी ट्रेनने (Passenger Train) स्कूल व्हॅनला (School Van) जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत ३ विद्यार्थ्यांचा (Students) मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास घडली. विद्यार्थी शाळेत (School) जात असताना अचानक ट्रेन आणि व्हॅनमध्ये धडक झाली. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना (Injured Students) तातडीने मुर्शिदाबाद मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल (Murshidabad Medical College and Hospital) येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
https://prahaar.in/2026/07/17/fda-raid-major-action-by-the-food-and-drug-administration-against-mumbais-famous-parsi-dairy-farm-license-suspended/
अपघाताची चौकशी सुरू, दोन रेल्वे कर्मचाऱ्यांवर कारवाई
या रेल्वे दुर्घटनेची चौकशी (Investigation) करण्यासाठी अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक (ADRM – Additional Divisional Railway Manager) यांच्या नेतृत्वाखाली १० सदस्यीय तपास पथक (Investigation Team) नियुक्त करण्यात आले आहे. दरम्यान, कामात निष्काळजीपणा (Negligence) केल्याप्रकरणी रेल्वेच्या दोन कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. गेटमन (Gateman) आणि सुपरवायझर (Supervisor) यांना निलंबित (Suspended) करण्यात आले आहे. दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई (Strict Action) केली जाईल, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.