Mumbai : भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना कार्डिफ येथे सुरु आहे. इंग्लंडनं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसऱ्या वनडेमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी ६० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करत नव्या विक्रमाला गवसणी दिली आहे. या भागीदारीदरम्यान विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनी कसोटी, वनडे आणि टी-२० या तीन फॉरमॅटमध्ये भारतासाठी आठ हजारांहून अधिक धावांची भागीदारी केल्याचा विक्रम आपल्या नावी केला आहे. या दोघांनी सौरव गांगुली आणि राहुल द्रविड, केन विल्यमसन आणि रॉस टेलर यांना मागं टाकलं.
View this post on Instagram
https://prahaar.in/2026/07/16/japan-open-2026-badminton-sindhu-enters-quarter-finals/
भारतासाठी सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली या दोघांनी भागीदारी करताना सर्वाधिक बारा हजार चारशे धावा केल्या आहेत. या यादीत दुसऱ्या स्थानी सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड आहेत. दोघांच्या भागीदारीतील धावांची संख्या ११ हजार ०३७ एवढी होती.
https://prahaar.in/2026/07/16/indias-energy-storage-capacity-to-increase-tenfold-by-2035-36/
भारतासाठी तीन फॉरमॅटमध्ये मिळून भागीदारी
१२४०० धावा: सचिन तेंडुलकर – सौरव गांगुली
११०३७ धावा: सचिन तेंडुलकर – राहुल द्रविड
८०२८ धावा: रोहित शर्मा – कोहली विराट कोहली *
७६२६ धावा: सौरव गांगुली – राहुल द्रविड द्रविड़
७१९९ धावा: विरेंद्र सेहवाग – गौतम गंभीर
View this post on Instagram
आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला असता कुमार संगकारा आणि महेला जयवर्धने यांचं नाव पहिल्या स्थानी आहे. दोघांची सर्व फॉरमॅटमधील भागीदारीतील धावसंख्या १३३६८ इतकी आहे. केन विल्यमसन आणि रॉस टेलर यांच्या ८०१८ धावा आहेत.
https://prahaar.in/2026/07/16/178-indian-fishermen-remain-in-pakistani-jails-despite-completing-their-sentences/
भारताची फलंदाजी पुन्हा अपयशी
भारत आणि इंग्लंडमधीस दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय फलंदाजी सुरुवात चांगली केली, मात्र मधल्या फळीतील फलंदाजांनी पुन्हा एकदा निराशाजनक कामगिरी केली. यामुळे भारतीय संघाला चांगली सुरुवात मिळूनही २५० धावांचा टप्पा गाठता आला नाही. इशान किशन एक रन करुन बाद झाला. तर, पहिल्या वनडेत भारताला विजय मिळवून देणारे वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल अपयशी ठरले. शिवम दुबेला खातं देखील उघडता आलं नाही. वॉशिंग्टन सुंदरनं 2 आणि अक्षर पटेल 1 रन करुन बाद झाला.श्रेयस अय्यरच्या ७१ चेंडूंमध्ये ६६ धावांच्या खेळीमुळा भारताला २३३ धावा करता आले.
https://prahaar.in/2026/07/16/jagannath-rath-yatra-stampede-stampede-like-situation-due-to-massive-crowds-during-the-jagannath-rath-yatra-one-dead-many-injured/
View this post on Instagram
भारताला दुसऱ्या वनडेमध्ये विजय मिळवत मालिका जिंकण्याची संधी आहे. भारतानं पहिल्या वनडेत विजय मिळवत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आज विजय मिळवल्यास भारत ही मालिका जिंकून टी-२० मालिकेतील पराभवाचा बदला घेऊ शकतो.