Home ब्रेकिंग न्यूज Jaykumar Gore : सोलापूर-मुंबई विमानसेवा २ ऑगस्टपासून पुन्हा सुरू होणार, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पाठपुराव्याला यश

Jaykumar Gore : सोलापूर-मुंबई विमानसेवा २ ऑगस्टपासून पुन्हा सुरू होणार, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पाठपुराव्याला यश

0
Jaykumar Gore : सोलापूर-मुंबई विमानसेवा २ ऑगस्टपासून पुन्हा सुरू होणार, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पाठपुराव्याला यश

सोलापूर : सोलापूर विमानतळावरून २८ जून पासून बंद असलेली सोलापूर ते मुंबई विमानसेवा स्टार एअरलाईन कंपनीकडून २ ऑगस्ट २०२६ पासून पुन्हा सुरू करण्यात येत आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

https://prahaar.in/2026/07/15/ceta-agreement-to-provide-new-momentum-to-farmers-entrepreneurs-and-msmes-pm-modi/

स्टार एअरलाईनची सोलापूर-मुंबई विमानसेवा तांत्रिक कारणांमुळे २८ जून २०२६ पासून बंद करण्यात आली होती. या मार्गावरील विमानसेवा बंद झाल्याने व्यापारी, उद्योजक, रुग्ण तसेच नोकरदार वर्गाची मोठी गैरसोय होत होती. सोलापूरकरांनी ही सेवा तात्काळ सुरू करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्टार एअरलाइन कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सोलापूर ते मुंबई विमानसेवा तात्काळ सुरू करण्याबाबतचे निर्देश दिले होते. त्याचबरोबर मुख्यमंत्री कार्यालयाकडूनही कंपनीला विमानसेवा सुरू करण्याबाबत सूचित करण्यात आले होते. गोरे यांनी दिल्ली येथे केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडेही याबाबत पाठपुरावा केला होता. या प्रयत्नांना यश आले असून स्टार एअरलाईन कंपनीने २ ऑगस्ट पासून सोलापूर-मुंबई मार्गावर विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने त्यांचे ऑनलाइन बुकिंग काउंटर सुरू करून २ ऑगस्ट पासूनच्या सोलापूर ते मुंबई प्रवासासाठी बुकिंग घेण्यास सुरुवात केली आहे.

https://prahaar.in/2026/07/15/will-the-chief-minister-sack-underperformers/

या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांची प्रतिक्रिया आली आहे. सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी हवाई जोडणी अत्यंत महत्त्वाची आहे. विमानसेवा बंद झाल्याने नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन आम्ही सातत्याने पाठपुरावा केला. आता ही सेवा पुन्हा सुरू होत असल्याने व्यापारी, उद्योजक, वैद्यकीय उपचारासाठी जाणारे रुग्ण आणि सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे; असे पालकमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरकरांच्या अडचणीची दखल घेऊन विमानसेवा पुन्हा सुरू करण्यासाठी तत्परतेने पावले उचलली. त्यांच्या या पाठबळामुळे सोलापूर–मुंबई विमानसेवा पुन्हा सुरू होत असून, सोलापूरचा पालकमंत्री म्हणून मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो, असेही पालकमंत्री गोरे म्हणाले.

https://prahaar.in/2026/07/15/co-chairpersons-appointed-for-the-chief-minister-baliraja-farm-access-road-scheme-across-91-assembly-constituencies-decision-by-revenue-minister-bawankule/

सोलापूर-मुंबई विमानसेवेचे वेळापत्रक आणि तिकीट दर स्टार एअरलाईनच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेले आहेत.

https://prahaar.in/2026/07/09/solapurs-long-pending-issue-of-125-years-has-been-resolved/

आगमन व प्रस्थान

सोमवार आणि बुधवार – आगमन सायंकाळी १७:१०(५.१०) वाजता आणि प्रस्थान सायंकाळी १७:४०(५.४०) वाजता.

शुक्रवार आणि रविवार – आगमन दुपारी १३:३०(१.३०) वाजता आणि प्रस्थान दुपारी १४:००(२.००) वाजता.

विमान आगमन व प्रस्थान कालावधी हा दिनांक २ ऑगस्ट ते १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत राहणार असून त्यानंतर वेळेत पुन्हा बदल होणार आहे, अशी माहिती विमानतळ प्राधिकरण यांच्याकडून देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here