– २३ जुलैला अटकपूर्व जामिनावर सुनावणी; अटकेची टांगती तलवार
मुंबई : उबाठा गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या अडचणीत कमालीची वाढ झाली असून, सुनेच्या छळ प्रकरणात त्यांना तात्काळ अंतरिम संरक्षण देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. राऊत यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर आता २३ जुलै रोजी मुख्य सुनावणी होणार असून, तोपर्यंत त्यांना न्यायालयाचे कोणतेही संरक्षण लाभलेले नाही. परिणामी, २३ जुलैपूर्वी पोलीस त्यांना चौकशीसाठी कधीही ताब्यात घेऊ शकतात किंवा त्यांच्यावर अटकेची कारवाई करू शकतात. कौटुंबिक छळ आणि जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाल्याने हे प्रकरण गंभीर मानले जात आहे. ( Vinayak Raut)
https://prahaar.in/2026/07/15/the-unique-cultural-heritage-of-maharashtra-konkans-sankasur-and-sanglis-tadkadtai/
विनायक राऊत यांची सून गिरिजा राऊत (Girija Raut) यांनी पती गीतेश राऊत, सासरे विनायक राऊत यांच्यासह कुटुंबातील एकूण ७ जणांविरुद्ध कौटुंबिक छळ आणि अंधश्रद्धा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पती शारीरिक संबंध ठेवण्यास असक्षम असल्याने सासरच्या मंडळींनी जादूटोणा आणि अघोरी उपायांचा अवलंब केला, असा गंभीर आरोप गिरिजा राऊत यांनी तक्रारीत केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी अघोरी कृत्य करणाऱ्या फिरोज शेख या भोंदूबाबाला आधीच अटक केली असून तो सध्या पोलीस (Thane Court) कोठडीत आहे. आता या गुन्ह्यात विनायक राऊत आणि त्यांच्या मुलाला अटक टाळण्यासाठी कायदेशीर लढा द्यावा लागत आहे. ( Uddhav Thackeray)
https://prahaar.in/2026/07/15/horrific-accident-on-the-mumbai-goa-highway-tragedy-strikes-a-family-returning-from-goa-three-killed-on-the-spot/
गिरिजा राऊत यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत पती आणि सासरच्या छळाचा हादरवून सोडणारा तपशील मांडला आहे. २०१७ मध्ये विवाह झाल्यानंतर ऊटी येथे हनीमूनला गेले असता, पती गीतेश याने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला व स्वतःला ‘मेंटल कनेक्ट’ होणे गरजेचे असल्याचे सांगत वारंवार टाळले. ( Maharashtra Politics) मुंबईला परतताना पालीच्या गणपती मंदिरात दागिने आणि साडीमुळे चालण्यास उशीर झाला म्हणून उपस्थित लोकांसमोर ‘तुला कुठेही घेऊन जाण्याची तुझी लायकी नाही’ अशा गलीच्छ भाषेत अपमानित केल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच २०१८ मधील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शारीरिक जवळीक साधण्याचा प्रयत्न केला असता, पतीने शिवीगाळ करत जबर मारहाण केली आणि ‘मला हात लावशील तर विधवा होशील’ अशी धमकी दिल्याचा आरोप त्यांनी केला. पतीचे शारीरिक संबंधांविषयी विचित्र मत असून, तो केवळ इंटरनॅशनल लोकेशन्सलाच कम्फर्टेबल असल्याचे सांगायचा आणि मुंबई व मालवणच्या घरी घरातल्या इतर लोकांना आवाज जाईल अशी कारणे देऊन दूर लोटायचा, असेही गिरिजा यांनी तक्रारीत नमूद केले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात आता न्यायालय २३ जुलै रोजी काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.