वेल्स : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू झाली आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने सहा गडी राखून विजय मिळवला आहे. अष्टपैलू अक्षर पटेलने गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्हीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत भारताला विजय मिळवून दिला. या विजयामुळे भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. गुरुवारी (१६ जुलै २०२६) होणाऱ्या सामन्याचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे.(Ind vs Eng)
https://prahaar.in/2026/07/15/pune-katraj-tuition-teacher-molested-minor-girl-police-register-pocso-fir-accused-arrest/
सामन्याच्या वेळेत बदल
भारत आणि इंग्लंड यांच्यांतील पहिला एकदिवसीय सामना बर्मिंगहॅम येथे भारतीय वेळेनुसार दुपारी ३:३० वाजता खेळवण्यात आला होता. दुसरा एकदिवसीय सामना इंग्लंडमध्ये दुपारी १२ वाजता, तर भारतीय वेळेनुसार ५ :३० सुरू होणार आहे. दुसरा एकदिवसीय सामना कार्डिफ येथे खेळला जाणार आहे. जर सामना पूर्ण ५० षटकं खेळवण्यात आला तर रात्री १ वाजता संपण्याची शक्यता आहे.
https://prahaar.in/2026/07/15/massive-elgar-protest-march-in-shrirampur/
कर्णधार बदलण्याची शक्यता ?
भारतीय संघाच्या कर्णधारपदात बदल होण्याची शक्यता आहे. कर्णधार शुभमन गिल पहिल्या सामन्यात जखमी झाला होता. पहिल्या सामन्यात ८० धावा केल्यानंतर तो रिटायर्ड हर्ट झाला होता. जर तो आगामी सामन्यात सहभागी झाला नाही, तर त्याच्या जागी श्रेयस अय्यरची कर्णधार म्हणून नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे.