Home ब्रेकिंग न्यूज Pune News : मदरसा क्लासच्या बहाण्याने घरी थांबवलं आणि १४ वर्षाच्या मुलीला नको नको तिथे… पुण्यातील कात्रज हादरले!

Pune News : मदरसा क्लासच्या बहाण्याने घरी थांबवलं आणि १४ वर्षाच्या मुलीला नको नको तिथे… पुण्यातील कात्रज हादरले!

0
Pune News : मदरसा क्लासच्या बहाण्याने घरी थांबवलं आणि १४ वर्षाच्या मुलीला नको नको तिथे… पुण्यातील कात्रज हादरले!
Pune News

पुणे : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे एका लहान मुलीवर झालेल्या अत्याचाराची संतापजनक घटना ताजी असतानाच, आता शहरातील कात्रज परिसरातून आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विद्येचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या पुण्यात एका १४ वर्षीय शाळकरी मुलीवर तिच्याच क्लास चालकाने लैंगिक अत्याचार केल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. ज्ञानदानाचे पवित्र काम करणाऱ्या एका शिक्षकानेच मुलीच्या असहाय्यतेचा आणि विश्वासाचा गैरफायदा घेत नको तिथे स्पर्श करून शिक्षकी पेशाला मोठा काळिमा फासला आहे. याप्रकरणी आंबेगाव पठार पोलीस ठाण्यात आरिफ सय्यद या आरोपी क्लास चालकाविरुद्ध ‘पोक्सो’ (POCSO – बालकांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण) कायद्यांतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

विश्वासाचा गैरफायदा आणि छेडछाडीची सुरुवात

पीडित मुलीने दिलेल्या माहितीनुसार, हा सर्व प्रकार अचानक घडलेला नाही. आरोपी आरिफ सय्यद हा संबंधित मुलीला लहानपणापासून शिकवणी देत होता, त्यामुळे मुलीचा आणि तिच्या कुटुंबीयांचा त्याच्यावर मोठा विश्वास होता. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून आरोपीने या विश्वासाचा गैरफायदा घेण्यास सुरुवात केली होती. ऑनलाईन क्लास सुरू असताना कॉम्प्युटरचा माऊस किंवा की-बोर्ड वापरण्यास मदत करण्याच्या बहाण्याने तो वारंवार तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत असे. मात्र, “सर आपल्याला लहानपणापासून शिकवतात, त्यामुळे त्यांचा स्पर्श चुकून होत असेल,” अशी निरागस समजूत या १४ वर्षीय मुलीने करून घेतली होती. शिक्षकाच्या या विकृत मानसिकतेची तिला अजिबात कल्पना नव्हती.

https://prahaar.in/2026/07/15/massive-elgar-protest-march-in-shrirampur/

मुक्कामाचा बहाणा आणि मध्यरात्रीचे ते भयंकर कृत्य

या प्रकरणाचा कळस सुमारे तीन ते चार आठवड्यांपूर्वी गाठला गेला. पीडित मुलगी आरोपी सरांच्या घरी ऑनलाईन मदरसा क्लाससाठी गेली होती. क्लास संपायला रात्रीचे साडेदहा वाजले. उशीर झाल्याचे कारण पुढे करत आरोपीने “आता खूप रात्र झाली आहे, तू आज इथेच थांब, मी सकाळी तुला घरी सोडून देईन,” असे मुलीला सांगितले. मुलीने सरांच्याच मोबाईलवरून वडिलांना फोन करून परवानगी घेतली. सरांच्या घरी त्यांची स्वतःची मुलगी, तिचा भाऊ आणि मैत्रीण असल्याने तसेच तिथे नेहमीच विद्यार्थी राहत असल्याने वडिलांनाही यात काही गैर वाटले नाही. सरांचे घर ‘वन बीएचके’ (1 BHK) असल्याने रात्री सर्वजण हॉलमध्ये झोपले. भिंतीकडे पीडित मुलगी, त्यानंतर सरांची मुलगी, तिची मैत्रीण, सरांचा मुलगा आणि सर्वात शेवटी आरोपी सर असे सर्वजण झोपले होते. मात्र, मध्यरात्रीच्या सुमारास मुलीला कुणीतरी तिच्या गुप्तभागाला स्पर्श करत असल्याची जाणीव झाली. ती दचकून जागी झाली असता, तिला आरोपी सर तिच्या शेजारी बसलेले दिसले. मुलगी जागी झाल्याचे पाहताच तो तिथून निघून गेला. या भयानक प्रसंगामुळे घाबरलेली मुलगी रात्रभर रडत एकाच जागी बसून होती.

बहिणीच्या सतर्कतेमुळे फुटले बिंग, नागरिकांचा आरोपीला चोप

या भीषण प्रसंगानंतर पीडित मुलगी प्रचंड मानसिक धक्क्यात होती. ती सतत शांत राहू लागली आणि तिने घरात बोलणेही सोडून दिले. मुलीच्या वागण्यातील हा अचानक झालेला बदल तिच्या मोठ्या बहिणीच्या लक्षात आला. तिने विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता, पीडितेने शिक्षकाने केलेल्या या नीच कृत्याचा पाढा वाचला. ही माहिती समजताच मुलीच्या वडिलांच्या पायाखालची वाळूच सरकली. त्यांनी तातडीने परिसरातील नागरिकांसह थेट क्लास चालकाला गाठले आणि या प्रकाराचा जाब विचारला. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या आरोपीने अखेर “माझ्याकडून चूक झाली,” अशी कबुली दिली. संतापलेल्या नागरिकांनी तिथेच त्याला बेदम चोप दिला आणि फरफटत नेत पोलिसांच्या हवाली केले. याप्रकरणी सध्या पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here