Home टेक्नॉलॉजी Aadhaar Name Change : लग्नानंतर आधार कार्डवर नाव कसं बदलायचं ?

Aadhaar Name Change : लग्नानंतर आधार कार्डवर नाव कसं बदलायचं ?

0
Aadhaar Name Change : लग्नानंतर आधार कार्डवर नाव कसं बदलायचं ?

तुम्हाला माहितीये का?

लग्नानंतर आधार कार्डवर नाव बदलण्याची योग्य पद्धत कोणती ?

Mumbai : तुम्हाला माहितीये का? लग्नानंतर एका छोट्याशा गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यामुळे अनेक महिलांना बँकांची कामे आणि सरकारी योजनांचा लाभ घेताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. ती अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे – आधार कार्डवरील नाव न बदलणे! लग्नाआधी मुलीच्या आधार कार्डवर तिच्या वडिलांचं नाव असतं, पण लग्नानंतर सासरचं नाव कसं लावायचं? अनेकांना वाटतं ही खूप किचकट आणि वेळखाऊ प्रक्रिया आहे, पण तसं अजिबात नाही. आज मी अत्यंत सोप्या पद्धतीत सांगणार आहे नेमकं कसं करायचं.(Adhar Card)

 

View this post on Instagram

 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

https://prahaar.in/2026/07/15/vinayak-rauts-anticipatory-bail-plea-rejected-likely-to-be-arrested-soon/

सर्वांत आधी हे समजून घेऊया की हे अपडेट का गरजेचं आहे. सध्याच्या काळात नवीन बँक अकाउंट उघडण्यापासून ते पॅन कार्ड अपडेट करण्यापर्यंत, किंवा शासनाच्या कोणत्याही लाडक्या योजनेचा लाभ घेण्यापर्यंत… प्रत्येक ठिकाणी तुमचं आधार कार्ड अपडेट असणं अनिवार्य आहे. जर आधार कार्डवरील नाव तुमच्या सध्याच्या नावाशी मॅच झाले नाही, तर तुमची महत्त्वाची कामे अडकू शकतात. आता पाहूया या प्रक्रियेसाठी कोणती कागदपत्रे लागतात. आधार कार्डवर नाव बदलण्यासाठी तुम्हाला प्रामुख्याने दोन पैकी एका अधिकृत कागदपत्राची गरज असते, पहिला पर्याय – Marriage Certificate : लग्नानंतर तुम्ही तुमच्या स्थानिक ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा महानगरपालिकेतून विवाहाची नोंदणी करून हे प्रमाणपत्र सहज मिळवू शकता. दुसरा पर्याय – (State Gazette): जर काही कारणास्तव तुमच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट नसेल, तर दुसरा कायदेशीर पर्याय म्हणजे राजपत्र किंवा गॅझेट. राज्य शासनाच्या गॅझेटमध्ये नावात बदल केल्याची अधिकृत नोंद करून तुम्ही हे प्रमाणपत्र काढू शकता.”

https://prahaar.in/2026/07/15/sir-now-mandatory-for-voter-id-cards-what-is-this-new-change/

ही कागदपत्रे हातात आल्यावर पुढची पायरी अगदी सोपी आहे. या दोन पैकी कोणतंही एक मूळ कागदपत्र घेऊन तुम्हाला तुमच्या जवळच्या ‘आधार सेवा केंद्रात’ जायचं आहे. तिथे नाव बदलाचा फॉर्म भरायचा आहे. या अधिकृत नाव बदलाच्या प्रक्रियेसाठी शासनाने फक्त १०० रुपये इतके नाममात्र शुल्क निश्चित केले आहे. केंद्रचालक तुमचे कागदपत्र स्कॅन करून बायोमेट्रिक्स घेतील आणि तुम्हाला एक पोचपावती देतील. तुम्हाला ही पोचपावती जपून ठेवायची आहे. यानंतर जास्तीत जास्त ९० दिवसांच्या आत तुमच्या आधार कार्डवरील नाव अपडेट होते. तुम्ही UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमचा नंबर टाकून तुमचं स्टेटस घरबसल्या ट्रॅक करू शकता. तर, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? तुमच्या ओळखीत ज्यांचे नुकतेच लग्न झाले आहे अशा नवविवाहित जोडप्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी प्रहारन्यूजलाईनला आताच फॉलो करा!”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here