गांधीनगर : गुजरातच्या गांधीनगर जिल्ह्यात 20 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या हत्येचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. विवाहित महिलेचा आंघोळ करतानाचा कथित व्हिडिओ काढून तिला ब्लॅकमेल करत लैंगिक संबंधांसाठी भाग पाडल्याचा आरोप संबंधित तरुणावर होता. याच संतापातून महिलेच्या पतीने तिच्या मदतीने तरुणाची गळा आवळून हत्या केल्याचा आरोप असून, पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.(Crime News)
https://prahaar.in/2026/07/15/horrific-wife-brutally-murdered-in-the-middle-of-the-street-in-mumbai-accused-husband-arrested/
मृत तरुण हार्दिक हा आरोपी दाम्पत्याच्या घराजवळच राहत होता. प्राथमिक तपासानुसार, दीड-दोन महिन्यांपूर्वी त्याने संबंधित महिलेचा आंघोळ करतानाचा कथित व्हिडिओ तयार केल्याचा दावा आहे. त्यानंतर हा व्हिडिओ दाखवून महिलेवर दबाव टाकत तिचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.दरम्यान, महिलेच्या पतीन तीला हार्दिकशी फोनवर बोलताना पाहिले त्यानंतर त्या दोघांमध्ये यालरुन वाद झाला. त्यावेळी महिलेने संपूर्ण प्रकार पतीला सांगितल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. त्यानंतर दोघांनी मिळून हार्दिकचा खून करण्याचा कट रचल्याचा आरोप आहे.योजनेनुसार, 11 जुलै रोजी महिलेने हार्दिकला घरी बोलावले. पती घराबाहेर गेल्याचे नाटक करून काही वेळाने परतला. हार्दिक घरात आल्यानंतर महिलेने त्याला बोलण्यात गुंतवून ठेवले, तर पतीने त्याच्यावर झडप घालत स्कार्फ आणि नंतर वायरने गळा आवळून त्याची हत्या केली, असा पोलिसांचा दावा आहे.
https://prahaar.in/2026/07/15/supriya-sule-we-will-consider-extending-support-if-the-total-number-of-lok-sabha-seats-is-increased-by-50-percent/
हत्येनंतर त्या दोघांनी मृतदेह प्लास्टिकच्या गोणीत भरला, घराला कुलूप लावले आणि तेथून पळ काढला. नंतर मुलांना शाळेतून आणून नातेवाईकांकडे सोडल्यानंतर शहरातून फरार होण्याचा प्रयत्न केला.हार्दिक बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. शवविच्छेदन अहवालात गळा आवळल्यामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपी दाम्पत्याला अटक केली आहे.पोलिसांनी सांगितले की, हार्दिकने ब्लॅकमेलसाठी वापरल्याचा दावा असलेला कथित व्हिडिओ अद्याप जप्त झालेला नाही. हत्येनंतर आरोपी पतीने हार्दिकचा मोबाईल फोडून रस्त्याच्या कडेला फेकून दिल्याचा आरोप असून, तो मोबाईल शोधण्यासाठी पोलिस आरोपींची रिमांड मागणार आहेत.(Blackmail Case)