Lock Upp 2 :’लॉक अप २’मध्ये अभिनेत्री शिल्पा शिंदेच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. शोदरम्यान शिल्पा शिंदे आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर श्रेया कालरा यांनी अभिनेत्री शिवांगी जोशी आणि अभिनेता हर्षद चोप्रा यांच्याविषयी बोलताना केलेल्या टिप्पणीवर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. ( Shilpa Shinde)
शोमध्ये शिवांगी जोशी आणि हर्षद चोप्रा एकमेकांशी संवाद साधत असताना, शिल्पा आणि श्रेया यांनी त्यांची नक्कल करत विनोदी शैलीत काही संवाद सादर केले. या वेळी शिल्पाने शिवांगीच्या वैयक्तिक आयुष्याचा आणि तिच्या व्हर्जिनिटीचा संदर्भ देणारी टिप्पणी केली. त्यानंतर श्रेया कालरानेही हर्षदची नक्कल करत या संवादात सहभाग घेतला. ( Lock Upp 2)
https://prahaar.in/2026/07/15/horrific-wife-brutally-murdered-in-the-middle-of-the-street-in-mumbai-accused-husband-arrested/
या प्रसंगादरम्यान शिवांगी जोशीने कोणतीही प्रतिक्रिया न देता शांत राहणे पसंत केले. (Shivangi Joshi)
दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी शिल्पा शिंदेच्या वक्तव्यावर टीका केली आहे. अनेकांनी एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्यावर किंवा चारित्र्यावर सार्वजनिकपणे टिप्पणी करणे अयोग्य असल्याचे मत व्यक्त केले आहे.
https://prahaar.in/2026/07/15/responsibility-for-garbage-collection-from-byculla-to-sion-finally-assigned-to-metro-waste/
ही पहिलीच वेळ नसल्याचेही प्रेक्षकांचे म्हणणे आहे. यापूर्वीही शोमध्ये शिल्पा शिंदेने शिवांगी जोशीला हर्षद चोप्रासोबत कमी बोलण्याचा सल्ला दिल्याने तिच्या वर्तनावर चर्चा झाली होती. आता नव्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा हा वाद चर्चेत आला असून, यावर संबंधित कलाकारांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. (Entertainment News)