Home क्राईम Mumbai Murder Case : भयंकर! भररस्त्यात पत्नीची निर्घृण हत्या; आरोपी पतीला अटक

Mumbai Murder Case : भयंकर! भररस्त्यात पत्नीची निर्घृण हत्या; आरोपी पतीला अटक

0
Mumbai Murder Case : भयंकर! भररस्त्यात पत्नीची निर्घृण हत्या;  आरोपी पतीला अटक
Thane Murder Case

मुंबई : अंधेरी (Andheri) पश्चिमेतील ओशिवरा परिसरात कौटुंबिक वादातून एका व्यक्तीने पत्नीची भररस्त्यात निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी संध्याकाळी आदर्श नगर येथील वाहतूक सिग्नलजवळ घडली असून, आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे. (Murder)

https://prahaar.in/2026/07/15/massive-fire-in-the-mumbai-coastal-road-tunnel-moving-car-catches-fire-passengers-scramble-to-save-their-lives/

प्राथमिक माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये वाद झाल्यानंतर आरोपीने प्रथम पत्नीवर दगडाने हल्ला केला. त्यानंतर धारदार चाकूने तिच्या गळ्यावर वार केल्याचा आरोप आहे. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महिलेला तातडीने कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. (Crime News)

https://prahaar.in/2026/07/15/mumbai-fda-raid-violation-of-food-safety-norms-proves-costly-major-action-taken-against-three-famous-mumbai-restaurants/

घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी जमली होती. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही व्हिडिओंमध्ये पोलिसांकडून जखमी महिलेला रुग्णालयात नेले जात असल्याचे दिसत आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, हे जोडपे भीक मागून उदरनिर्वाह करत होते. मंगळवारी सायंकाळी सुमारे 6.30 वाजण्याच्या सुमारास दोघांमध्ये वाद झाला. त्यावेळी दोघेही मद्यधुंद अवस्थेत असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

विशेष म्हणजे, ही घटना ओशिवरा पोलीस ठाण्यापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, हत्येमागील नेमके कारण आणि इतर परिस्थितीचा तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here