Home ब्रेकिंग न्यूज Maldhok News : माळढोक अधिसूचित क्षेत्रात बिबट्याचे अवशेष आढळले; मृत्यूचे कारण शोधण्यासाठी वन विभागाचा तपास सुरू

Maldhok News : माळढोक अधिसूचित क्षेत्रात बिबट्याचे अवशेष आढळले; मृत्यूचे कारण शोधण्यासाठी वन विभागाचा तपास सुरू

0
Maldhok News : माळढोक अधिसूचित क्षेत्रात बिबट्याचे अवशेष आढळले; मृत्यूचे कारण शोधण्यासाठी वन विभागाचा तपास सुरू

अहमदनगर  : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील कोसेगव्हाण येथील माळढोक (Maldhok) अधिसूचित क्षेत्रात बिबट्याचे मुंडके आणि मागील दोन पाय आढळून आल्याने वन विभागात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.

https://prahaar.in/2026/07/13/st-depot-lands-to-be-leased-out/

वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली भगत यांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ जुलै रोजी कोसेगव्हाणचे सरपंच यांनी बिबट्याचे अवशेष आढळल्याची माहिती दिली. त्यानंतर वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. पाहणीदरम्यान बिबट्याचे मुंडके आणि मागील दोन पाय सापडले, मात्र उर्वरित अवयवांचा शोध घेऊनही ते मिळाले नाहीत.

प्राथमिक तपासात बिबट्याचा मृत्यू सुमारे आठ ते दहा दिवसांपूर्वी झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सापडलेल्या अवयवांवर अळ्या पडलेल्या होत्या. हे अवशेष पुढील तपासणीसाठी श्रीगोंदा येथे नेण्यात आले असून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केली. (forest department)

https://prahaar.in/2026/07/13/the-first-flyover-of-the-goregaon-mulund-link-road-will-open-to-traffic-in-september/

तपासणीत बिबट्याचे सर्व दात आणि नखे सुस्थितीत असल्याचे आढळले. त्यामुळे शिकारीच्या उद्देशाने हत्या झाल्याची शक्यता सध्या कमी असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे. एखाद्या वन्य प्राण्याने मृत बिबट्याच्या शरीराचा मधला भाग खाल्ला असावा, अशी प्राथमिक शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ही घटना माळढोक अधिसूचित क्षेत्रात घडल्याने माळढोक पक्षी अभयारण्याचे अधिकारी आणि वन विभागाचे कर्मचारी पुढील तपास करत आहेत. बिबट्याच्या मृत्यूचे नेमके कारण तपास अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here