मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री मेधा मांजरेकर (Medha Manjrekar) यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत आपल्या गंभीर आजाराबाबत प्रथमच खुलासा केला आहे. उपचारादरम्यानचे काही फोटो (Photo) शेअर करत त्यांनी कॅन्सरशी दिलेल्या लढ्याचा अनुभव मांडला असून, त्यांच्या या पोस्टने चाहत्यांसह अनेक कलाकारही भावुक झाले आहेत.
https://prahaar.in/2026/07/12/shocking-brutal-murder-of-young-entrepreneur-complete-shutdown-in-shrirampur/
मेधा मांजरेकर यांनी लिहिले की, त्यांच्या उपचारांचा एक महत्त्वाचा टप्पा आता पूर्ण होत आला आहे. या प्रवासात सर्जरी, केमोथेरपी (chemotherapy) आणि रेडिएशनसारख्या कठीण उपचारांना सामोरे जावे लागले. मात्र, या संपूर्ण काळात आपण कधीच एकट्या नव्हतो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
त्यांनी आपल्या गुरू, डॉक्टर, परिचारिका, कुटुंबीय, मित्र-मैत्रिणी आणि अगदी अनोळखी व्यक्तींनीही दिलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. संकटाच्या प्रत्येक क्षणी कोणीतरी मदतीला धावून आले आणि त्यातूनच पुढे जाण्याची ताकद मिळाली, असे त्यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे.
https://prahaar.in/2026/07/12/moshi-building-collapse-tragedy-strikes-moshi-9-dead-in-the-incident-search-for-one-person-still-underway/
मेधा यांनी आपल्या मुलींबद्दलही भावनिक शब्दांत लिहिले. आयुष्यभर आई मुलांचा हात धरते, पण या प्रवासात मुलींनीच आपला हात धरून आधार दिला, असे त्यांनी सांगितले. पती महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनीही प्रत्येक टप्प्यावर खंबीरपणे साथ दिल्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानले. ( (Cancer Threatment))
View this post on Instagram
उपचारांदरम्यान मित्र-मैत्रिणींनी केलेल्या छोट्या-छोट्या गोष्टींचाही त्यांनी उल्लेख केला. आवडीचे पदार्थ आणणे, वेळ देणे, प्रार्थना करणे आणि सतत सकारात्मक वातावरण ठेवण्याचा प्रयत्न यामुळे कठीण काळ अधिक सुसह्य झाल्याचे त्यांनी सांगितले.
मेधा मांजरेकर यांच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या धैर्याचे कौतुक करत लवकर पूर्णपणे निरोगी व्हावे, अशा शुभेच्छांचा वर्षाव सोशल मीडियावर होत आहे.