अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड (Jamkhed) तालुक्यात एका लग्नसमारंभात किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे गंभीर हाणामारीत रूपांतर झाले. राजेवाडी येथील मंगल कार्यालयात स्वागताची घोषणा करत असलेल्या ३७ वर्षीय तरुणावर तलाठ्याने लोखंडी रॉड असलेल्या माईकने हल्ला (Attack) केल्याची घटना शनिवारी (११ जुलै) दुपारी घडली. या हल्ल्यात तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
https://prahaar.in/2026/07/12/minor-dispute-escalates-youth-stabbed-to-death-friend-critically-injured/
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक रामचंद्र पठाडे (वय ३७, रा. जवळा, ता. जामखेड) हे विवाह सोहळ्यात उपस्थित पाहुण्यांचे माईकवरून स्वागत करत होते. यावेळी तलाठी शिवाजी सखाराम हजारे यांनी आपले नाव स्वागतावेळी जाहीर न केल्याच्या कारणावरून पठाडे यांना जाब विचारला. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. (Crime News)
https://prahaar.in/2026/07/12/amit-satam-demands-installation-of-trash-booms-on-all-drains-flowing-into-the-sea-writes-to-mayor-and-commissioner/
तक्रारीनुसार, आरोपीने शिवीगाळ करत पठाडे यांना मारहाण केली आणि हातातील लोखंडी रॉड असलेला माईक त्यांच्या डोक्यात मारला. तसेच जीवे मारण्याची धमकी देत घटनास्थळावरून पळ काढल्याचा आरोप करण्यात आला आहे.
घटनेनंतर उपस्थितांनी हस्तक्षेप करून जखमी पठाडे यांची सुटका केली. त्यानंतर त्यांना तातडीने जामखेड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या प्रकरणी अशोक पठाडे यांच्या फिर्यादीवरून शिवाजी सखाराम हजारे यांच्याविरुद्ध जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.