Home ब्रेकिंग न्यूज Food poisoning : नंदुरबारमध्ये धक्कादायक घटना! वस्तीगृहातील ५० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ३ जणांची प्रकृती चिंताजनक

Food poisoning : नंदुरबारमध्ये धक्कादायक घटना! वस्तीगृहातील ५० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ३ जणांची प्रकृती चिंताजनक

0
Food poisoning : नंदुरबारमध्ये धक्कादायक घटना! वस्तीगृहातील ५० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ३ जणांची प्रकृती चिंताजनक

नंदुरबार : नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील शहादा येथील समाज कल्याण विभागाच्या वस्तीगृहात अन्नातून विषबाधा (Food poisoning) झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. रात्रीचे जेवण केल्यानंतर सुमारे 40 ते 50 विद्यार्थ्यांना अचानक मळमळ, उलट्या आणि अस्वस्थतेचा त्रास सुरू झाला. या घटनेनंतर सर्व विद्यार्थ्यांना तातडीने शहादा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यापैकी तीन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

https://prahaar.in/2026/07/12/mumbai-pune-rail-service-disrupted-st-buses-step-in-to-help-passengers-additional-shivneri-buses-introduced/

प्राथमिक माहितीनुसार, विद्यार्थ्यांनी रात्रीच्या जेवणात डाळ-भात, शेवग्याची भाजी आणि चपाती खाल्ली होती. जेवणानंतर अवघ्या १५ ते २० मिनिटांत अनेक विद्यार्थ्यांना त्रास जाणवू लागला. काही वेळातच बाधित विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने वस्तीगृहात गोंधळ उडाला आणि प्रशासनाला माहिती देण्यात आली. (Food poisoning)

घटनेची माहिती मिळताच तहसीलदार संभाजी पाटील, प्रांत अधिकारी दीपक गिरासे आणि शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी ग्रामीण रुग्णालयात (Hospital) भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. विषबाधेचे नेमके कारण शोधण्यासाठी अन्नाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येणार असून, प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे.

https://prahaar.in/2026/07/12/bmc-news-the-municipal-corporations-standing-committee-chairman-hit-back-at-the-oppositions-allegations-stating/

दरम्यान, उपचार घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी वस्तीगृहात निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. यापूर्वीही अनेक वेळा अन्नाच्या गुणवत्तेबाबत तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. या निष्काळजीपणामुळेच ही परिस्थिती ओढवल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

घटनेनंतर वस्तीगृहाचे वॉर्डन आणि संबंधित शिक्षक वेळेवर रुग्णालयात न पोहोचल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला. जबाबदार अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

सध्या सर्व विद्यार्थ्यांवर वैद्यकीय उपचार सुरू असून, तीन गंभीर विद्यार्थ्यांवर डॉक्टरांचे विशेष लक्ष आहे. तपास अहवालानंतर विषबाधेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here